Join WhatsApp group

‘जनसुरक्षा’ नव्हे, ‘जनविरोधी’ विधेयक!अकोल्यात नागरिकांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला | राज्य सरकारने सादर केलेल्या तथाकथित ‘जनसुरक्षा’ विधेयकाविरोधात अकोल्यात जनआक्रोश उसळनार आहे.

संविधान, लोकशाही व मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी एकत्र आलेल्या विविध सामाजिक संघटनांनी १७ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजता अशोक वाटिका, अकोला येथे भव्य लोकप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात येणार आहे.

विधेयकाचा विरोध का?

या विधेयकाद्वारे सरकारविरोधात मत मांडणाऱ्यांवर देशद्रोहाचा ठपका, संघटनांवर थेट बंदी, त्यांची मालमत्ता जप्त करणे, आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे अशा अनेक धोकादायक तरतुदी आहेत. शांततामय निषेध, कामगारांचे आंदोलन, पत्रकारांचे रिपोर्टिंग यावरही कारवाईची भीती या कायद्यामुळे निर्माण झाली आहे.

लोकशाहीविरोधात ‘अघोषित आणीबाणी’?

गजानन हरणे (संयोजक, निर्भय बनो जनआंदोलन) यांनी सांगितले की, “हे विधेयक म्हणजे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक नागरिकाने याविरोधात एकत्र यायला हवे.”सर्वांना आवाहनया विधेयकाविरोधात आवाज फक्त कार्यकर्त्यांचा न राहता, तो जनतेचा आवाज व्हावा यासाठी सर्व विचारधारा, जाती-धर्म बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“स्वातंत्र्य वाचवा – संविधान वाचवा – लोकशाही वाचवा!”

या घोषणांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून टाकण्याची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया गजानन हरणे यांनी दिली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!