Join WhatsApp group

शेजाऱ्यांनी केली मारहाण; महिलेला दुखापत – दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (दिनांक २० जुलै २५): मूर्तिजापूर शहरातील लकडगंज ढोर दवाखाना परिसरात १८ जुलै २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास एका महिलेवर शेजाऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात BNS कलम 118(1), 115(2), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सौ. उषाबाई संजय गाडगे (वय ४४, व्यवसाय – मजुरी, रा. लकडगंज ढोर दवाखाना, मूर्तिजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या १८ जुलै रोजी रात्री ९.३० वा. घरी होत्या. त्यावेळी त्यांचा शेजारी प्रविण भानुदास तायडे हा दारूच्या नशेत घराबाहेर शिवीगाळ करत होता. फिर्यादीच्या मुलाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने मुलाला धक्काबुक्की करून रस्त्यावर ढकलले.

या गोंधळात उषाबाई गाडगे बाहेर आल्यावर प्रविण तायडे याने त्यांनाही शिवीगाळ केली. याचवेळी दुसरा आरोपी अरविंद भानुदास तायडे हा हातात काठी घेऊन बाहेर आला आणि फिर्यादी यांच्यावर काठीने मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली असून सूज निर्माण झाली आहे.

पीडित महिला घाबरलेल्या अवस्थेत दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ जुलै २०२५ रोजी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांना तत्काळ सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफानोद्दीन (ब. नं. १३३६) करीत आहेत, तर गुन्हा दाखल अधिकारी गोपालसिंग ठाकूर (ब. नं. १६३२) यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदविण्यात आला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!