Join Whatsapp

स्व.उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशनचा नवदुर्गा पुरस्कार सोहळा संपन्न

Photo of author

By Sir

Share

न्युज डेस्क – नाशिक – स्व. उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी नवरात्री उत्सवानिमित्त नवदुर्गा पुरस्काराचे आयोजन करण्यात येते समाजामध्ये आपला परिवार सांभाळून आपल्या कौटुंबिक जबाबदारी व्यतिरिक्त शासकीय सेवेत , खाजगी सेवेत, व्यवसायिक क्षेत्रात ,सामाजिक, राजकीय क्षेत्रात ,आपल्या अबूतपूर्व कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या नऊ महिलांचा नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

त्याचबरोबर शंभर महिलांना कर्तबगार महिला पुरस्कार देऊन या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. महिलांमध्ये या कार्यक्रमामुळे अतिशय आनंदाचे वातावरण होते नाशिक पूर्व विभागातील अनेक महिलांचा या सन्मान सोहळ्यात सहभाग होता अनेक महिलांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे तसेच फाऊंडेशन ला नेहमीच प्रोत्साहन दिल्या बद्दल आमदार अॅड. राहुल ढिकले यांचे विशेष आभार मानले पुरस्कारार्थींना संबोधित करताना जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील मॅडम यांनी आपण कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी सांभाळताना होणाऱ्या कसरती मध्ये आपण स्वतःला थोडा वेळ काढत व स्वास्थ जपावे नियमित व्यायाम करावा असे सांगितले.

त्याचबरोबर डॉक्टर सुनील ढिकले यांनी भारतीय थोर महिलांच्या कामाला उजाळा देत त्या सर्व महिला या जणू दुर्गा मातीचेच रूप होत्या त्यांच्या प्रमाणेच सर्व महिलांमध्ये नवदुर्गांचा अंश असून त्या घरातील एक ,कामावर एक, समाजात एक ,व्यवसायात एक, अशा विविध ठिकाणी विविध दुर्गा रुपात वावरत असतात फक्त त्यांनी स्वतःला ओळखणे स्वतःचा आत्मविश्वास जागवणे गरजेचे आहे असे सांगितले

या पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सरचिटणीस श्री राजेंद्र निकम ,मा. नगरसेवक अरुण पवार , नाशिक भाजपा सरचिटणीस अमित घुगे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वडजे आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील यांच्या शुभ हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र चे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले होते. नवदुर्गा म्हणून मेघा शिंपी , गीता व्यास, रूपाली लोखंडे, समीक्षा निकम, मनीषा धात्रक, संयोगिता भवर, सुरेखा विघे , ज्योत्सना जवरे, मनीषा छाबिया यांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन स्व. उत्तमरावजी ढिकले फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अशोक दुधारे सरचिटणीस दीपक निकम खजिनदार ज्योती निकम यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन सौ. विजया दुधारे , आनंद चकोर, कुणाल अहिरे अस्मिता मोगल यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे विश्वस्त राजीव वाकडे, अविनाश वाघ, ऋषिकेश रसाळ, महिला निवड समिती मध्ये मनीषा काठे, सुरेखा दिवेकर सोनाली सूर्यवंशी, पूर्णावती भामरे आदींनी प्रयत्न केले


Share

Leave a Comment

error: Content is protected !!