Join Whatsapp

विकासची चड्डी हळू हळू फाटत आहे का ?

Photo of author

By Sir

Share

मुर्तीजापुर शहरात व तालुक्यात अनेक कोट्यावधी चे काम आज पर्यंत झाले आहे, त्या मध्ये रस्ते असो स्वच्छता अभियान असो शासनाने केंद्र सरकार कोणती पण योजना असो पण मात्र तालुक्याला कोणतीच कमी आज पर्यंत पडली नाही गल्ली पासून दिल्ली पर्यंत ची प्रत्येक योजना तालुक्यातील अनेक नेते मंडळीने आपला जोर लाऊन खेचून आणली हि बाब खूप प्रशंसा करण्यासारखी आहे.

आपल्या तालुक्यात कोणता जर विकास काम होत असेल तर खूप कमी आंदोलन व त्याच्या कामची तक्रारी पेपरबाजी नाहीश्या बघायला मिळतात. आज आपली तालुक्यालीत ग्रामपंचायत,नगरपरिषद, खूप सुखी आहे. लोकांना कुठल्याही विकासाची मागणी न करता विकास लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून विकास घडविला जातो.

आज तालुक्यात चांगल्या शासकीय इमारती, दवाखाने नुतनीकरणची कामे खुप सुव्यवस्थित झाली आहे बाहेरगावी राहणारा आपल्या इकडचा माणूस खूप वर्ष नंतर जर आला तर तो हि या विकासाचि स्तुती करतो.

पण मात्र जे विकासाची कामे होत असतात त्याची ग्यारंटी वारअंटी असते कि नाही ?

शहरातील एक मुख्य रस्ता थोडा फार वादग्रस्त होता आता हि आहे पण कसामसा किती वेळजरी लागला तरी बनला रस्ता बनत असताना कित्येक अपघात झाले त्यासाठी आंदोलन झाले हे चित्र स्पष्ट आहे कुठे तो रस्ता लहान तर कुठे मोठा कोणत्या रस्त्या बद्दल माहिती देत आहे हे आपल्याला माहित झाले असेल सध्या त्या रस्त्याची अवस्था दिवसेदिवस खूप खराब होत चाललेली आहे त्त्या वरची सिमेंट ची कोटिंग गाडीचा टायरणे चाटली आहे असे दिसते व आकाशातून काही उल्का पिंड त्या रस्त्यावर पडले व तिथे गड्डे पडले असे त्या रस्त्यावर गेल्या नंतर भासते.

आठवडी बाजारात लाखो रुपये खर्च करून भाजी विक्रेत्या साठी सिमेंट कॉक्रीट चे शेड बांधले त्याची ग्यारंटी वारअंटी संपली कि बाकी आहे ते माहित नाही पण ते पडले त्याचा बेड खोदुन चोरट्यांनी त्या मधले मुरूम चोरले गेले तक्रार झाली नाही कि नाही माहित नाही एक शेड तर अक्खा पिल्लर तुटून खाली पडला आहे त्या शेडला नगरपरिषदेने क्षतिग्रस्त घोषित केले नाही व तिथे असा कोणताही फलक लावला नाही आठवडी बाजारत हजारो लोक जात असतात जर अपघात झाला तर कोण जबाबदार ?

एक गावात तर स्वच्छता भारत अंतर्गत महिला व पुरुष साठी मुख्य रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून शौचालाय बांधण्यात आले त्यासाठी लाखो रुपये निधी उप्लबद्ध झाला त्या मध्ये बोरिंग खोदण्यात आली पण त्या बोरिंग चे पाणी राजकिय माणसाचा शेता मध्ये वापरण्यात येत आहे तसेच शौचालाय वर टाकीच नाही टाकी गेली कुठे ? चोरी गेली असेल तर पोलीसस्टेशन मध्ये तक्रार झाली का? स्वच्छता अभियान अंतर्गत येणाऱ्या कार्यक्रमाला मोठे नेते हजेरी लाऊन भाषान देतात व महत्व समजून सांगतात एवड पुरेसा आहे का?

पाण्याच्याबद्दल विचार केला तर तो विषय न संपणारा

विषय भरपूर आहे पण मात्र सगळ सांगत बसणे म्हणजे सोसेल तेवढं बोलावं पचेल तेवढं ऐकावं!

थोडक्यात सांगलीत तर विकास हा लठ्ठ झाला असून त्याची चड्डी आता आकुड होत असेल त्यामुळे त्याची चड्डी कदाचित फाटत असेल.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!