Join WhatsApp group

मुर्तीजापुर विधानसभेत तिरंगी लढत निश्चित – पण नवीन काही होण्यची शक्यता

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – मतदार संघ ३२ मध्ये तीन पक्षाने आपले वर्चस्‍व ठेवून असलेल्‍या तीन दिग्‍गजांची मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी ठरणार आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या (शरद पवार) उमेदवार सम्राट डोंगेरदिवे , भाजपचे हरीश पिंपळे आणि वंचित कडून सुगत वाघमारे यांच्‍यासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्‍वाची परीक्षा घेणारी आहे.

सुगत वाघमारे यांना वंचित ने पहिलेच उमेदवार घोषित केली असून महाविकास आघाडीने सम्राट डोंगेरदिवे यांना उमेदवारी दिली, त्यामुळे दोन्ही एकाच समाजाचे झाल्यामुळे त्यांचा समाज आता कसा आपल्या कडे येईल या साठी दोघांची रस्सीखेच सुरु आहे. तर मुस्लीम समाज साठी पण असेच काहीसे चित्र आहे, मुस्लीम समाजाची भूमिका सध्या तठस्त असून मुस्लीम समाजा मधले काही नेते दोघाही पक्षात पाहायला मिळत आहे, त्या नेत्यांन वर भरोसा ठेवून आता बाकीचा समाज कुणा कडे जाईल हे अद्याप गुलदस्त्यात आणखी यांच्‍यामुळे होणारी मतविभागणी कुणाच्‍या पथ्‍यावर पडणार, याचे औत्‍सुक्‍य मतदार संघात सगळ्यांना लागले आहे.

सम्राट डोंगेरदिवे यांचा कडे जिल्हा परिषदचा अनुभव असून सुगत वाघमारे हे दूरदर्शी, नम्र, उच्च शिक्षित उमेदवार आहे. पण जर काही ठराविक समाजाने यांना धोका नाही दिला व यांचा पदाधीकार्यांनी इमानदारीने आपल्या पक्षाचे काम केले तर या मधून एक निवडून येऊ शकतो हे शक्यता नाकारता येत नाही.

इकडे भाजपची सत्ता मागील १५ वर्षापासून असून हरीश पिंपळे हेच या मतदारसंघात प्रत्येक वेळेस निवडून येत असताना भाजपची या मतदारसंघात पकड खूप मजबूत आहे, हरीश पिंपळे यांचा वर जनता नाराज आहे पण मागील ३ निवडणुकीचा निकाल पाहता हरीश पिंपळे यांना अखेरचा वेळेस कोणता डाव टाकायचा हे खूप चांगल्या पद्दतीने माहित आहे.

पण हरीश पिंपळेवर मतदार संघातील काही जनता नाराज आहे, अशी जनते मध्ये चर्चा आहे याचा फायदा कोणी उमेदवार घेऊ शकणार का ?असा सुद्धा एक प्रश्न मतदार संघात आहे, पण नाराज वर्गाची हि क्षणिक नाराजी आहे, वेळ पडल्यावर हरीश पिंपळे चांगल्या चांगल्याची नाराजी दूर करू शकतात असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

यांचा कडे सगळ्याच समाजची मते असल्यामुळे थोडे-थोडे का होइना पण प्रत्येक समाजाचे मत यांना मिळतात व ज्या समाजावर बाकी उमेदवाराचा लक्ष नाही तो समाज यांचा खूप जवळचा आहे व तोच समाज यांना प्रत्येक निवडणुकीत लीड देतो, भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असून भाजपचे कार्यकर्ते इमानदारीने आपले कार्य पार पडतात तिथूनच यांचा विजयाचे सूत्र सुरु होतात. भाजप आखरी क्षणाला आपली गुट बाजी बाजूला ठेवून काम करते. साम दाम दंड भेद याचा वापर भाजप पक्षाला चांगल्या रित्या करता येते.

या निवडणुकीत रवी राठी व सम्राट सुरवाडे हे दोघे दोन नंबर वर असणार्या उमेदवारासाठी निर्णायक ठरणार आहे.

तसेच मतांची विभागणी जास्तच प्रमाणात झाली तर या मध्ये रवी राठी यांची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. कारण रवी राठी यांचे राजकीय संबंध सरळ सामान्य जनते सोबतचे आहे, आणि अपक्ष उमेदवार असल्यामुळे अमरावती जिल्हा राजकीय नमुन्या वर जाण्याचा मार्गावर जनता या वेळेस तसल्या प्रकारचा निर्णय घेऊ शकते का ?

आता हा संपूर्ण तिढा मतदानाची पेटी उघडल्यावरच सुटेल.तरी मतदारसंघातील जनतेने सामाजिक,धार्मिक,आर्थिक या विषयला बाजूला ठेवून सुढ बुद्धीने मतदानाचा हक्क पार पाडावा व १००% मतदान करून लोकशाहीची संस्कृती ठिकवून ठेवावी.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!