Join WhatsApp group

किनखेड येथे शेतकरी आत्महत्या

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – २५/नोव्हें/२४ – कधी नापिकी, कधी पिकांना मातीमोल भाव, डोक्यावरील कर्ज फेडायचे कसे याचा तणावात मुर्तीजापुर तालुक्यात किनखेड येथे राहणाऱ्या एक युवा शेतकर्याने सकाळी आपल्या शेतात झाडाला गडफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते.

युवा शेतकरी कर्ज बाजरी झाल्यामुळे खूप दिवसांपासून नैराश्या मध्ये आपले जीवन जगत होता असे गावकर्यांचे म्हणणे आहे . पंकज मांगुळकर वय अंदाजे ३६ वर्ष रा. किनखेड असून त्याला पत्नी व तीन मुली व आई असे परिवार त्याचा मागे आहे.

सकाळी ८ वा एक इसम आपल्या शेतात जात असताना त्याला गडफास घेतलेला मृतदेह झाडाला लटकलेला आढळला, त्यानंतर किनखेड -कामठा गावात हि बातमी पसरली गावातल्या लोकांनी मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनला या बाबत माहिती दिली व सध्या मृतदेह मुर्तीजापुर येथे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदणासाठी आणले आहे, व मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!