Join Whatsapp

मूर्तिजापुरातील अतिक्रमण करवाई फक्त नावासाठी व बिल काढण्यासाठी का?

Photo of author

By Sir

Share

न्युज डेस्क – प्रत्येक वर्षी कोणी प्रतिष्ठित व्यक्तीने किव्वा कायदे पंडितने अतिक्रमानाची तक्रार दिली त्याच वेळेस मुर्तीजापुरात अतिक्रमणाची कारवाई होते का?
अतिक्रमण जर आला त्यामध्ये अतिक्रमण धारकांचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते असते.

जेसीबीने त्यांच्या दुकाने पाडले जातात मग काही नेते मंडळी हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांना काही वेळ थांबण्याचा सल्ला देतात. त्यावेळेस शहरात या प्रकरणाची चांगली चर्चा होते.
अतिक्रमनाचा रिक्षा गावात फिरला रे फिरला तर लगेच दुकानदार आपले मोठमोठे खोके हाथ गाडी,ऑटो मध्ये टाकून गावाच्या बाहेर किंवा खुल्या मैदानात ठेवताना दिसतात.
अशा वेळेस त्या दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडते अतिक्रमण धारकांना शासनाच्या वतीने आजपर्यंत कुठलेच हॉकर्स झोन उपलब्ध झाले नसून हक्काची जागा मिळाली नाही.
सध्या अतिक्रमणामुळे मूर्तिजापूरकरांची चांगलीच कोंडी होत आहे. नगर परिषदेने स्टेशन विभाग जुनी वस्ती तसेच संपूर्ण शहरात कोटी रुपये खर्च करून पैदल चालणाऱ्यांसाठी फुटपाथ बनविले विकास हा फक्त राजकीय व शासकिय फायद्या साठीच आहे का?
फुटपाथवर पूर्ण शहरात अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे.
या मुळे सगळ्यात जास्त पार्किंगची व वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांना दररोज होत असते.

मधल्या काळात दर रोज नगरपरिषदेची अतिक्रमण धारकांना कर आकारणी आकारली होती. पण ते वैद्य नाही की काही राजकीय हस्तक्षेपामुळे ती बंद झाली का ?

आता हे चूक होते की बरोबर हे कुणास ठाऊक.

छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून ते पोळा चौक पर्यंत रस्त्याच्या बाजुला फुटपाथ भाजी विक्रेते व फळ विक्रेते तसेच वेग वेगळे अतिक्रमण धारक बसलेले असतात.
तसेच मुर्तीजापुर शहरातील सुप्रसिद्ध सुभाष डेरी पण या रस्त्यावरच आहे तिथे हजारो लोक दूध घेण्यासाठी येत असतात व आपले वाहन त्या डेरी समोर पार्क करतात एक ऑटो सुद्धा जरी येथे फसला तर पूर्ण अख्खा रस्ता सुरळीत व्हायला पाच ते दहा मिनिटे लागतात.


तसेच सुभाष चौक ते बस स्टॅन्ड पर्यंत शेकडो दुकाने या स्टेशनसमोरील भिंतीला लागून आहे या रस्त्यावरून अवजड वाहने या रस्त्या वरून दिवसभर ये जा करत असतात.


तसेच या रस्त्यावर 100 च्या अंतरावर आजूबाजूला रेल्वे स्टेशन व बस स्थानक आहे येथे दिवसभर प्रवाशांची वर्दळ सुरू असते.


रेल्वे स्टेशन व बस स्थानकासमोर अनेक ऑटो हे रस्त्यावर पार्क असून येथे पण वाहतूक कोंडी दररोज बघायला मिळते

जर कोणी चुकून स्टेशन समोर अतिक्रमण धारकाच्या दुकानासमोर गाडी लावली असेल तर तो अतिक्रमण धारक त्या नागरिकास अरेरावी करतो व त्या नागरिकांची गाडी रस्त्याच्या मधात उभी करून देतो असे अनेक किस्से दररोज येथे पाहायला मिळतात

पण मात्र ही चिंता फक्त नागरिकांचीच आहे याच्याशी नगरपरिषद प्रशासनाचे काहीच घेणे देणे नाही का?
तक्रार असल्यावर किंवा वरून आदेश असल्यावरच अतिक्रमणाची कारवाई नगर परिषदेकडून होत असते का?
हे प्रश्न व समस्या वर्षानुवर्षे अशीच चाललेली आहे व अशीच चालत राहील का?


Share

2 thoughts on “मूर्तिजापुरातील अतिक्रमण करवाई फक्त नावासाठी व बिल काढण्यासाठी का?”

Leave a Comment

error: Content is protected !!