Join WhatsApp group

मूर्तिजापूरच्या महेश पेट्रोल पंपाची दादागिरीरात्री इंधन नाकारून नागरिकाला मनस्ताप; पंप प्रशासन उद्धट वागणुकीवर ठाम?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (दि. २३ जुलै २५):शासन नियम आणि ग्राहक हक्कांना हरताळ फासणारी धक्कादायक घटना मूर्तिजापूर शहरात उघडकीस आली आहे. येथील महेश पेट्रोल पंपावर रात्री इंधन देण्यास सरळ नकार देत, ग्राहकास मनस्ताप सहन करावा लागला. ही घटना केवळ सेवा अपयश नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट निगडीत असल्याने शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

संबंधित घटना २१ जुलै रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष उज्वल वसंतराव ठाकरे यांचे वाहन पेट्रोल संपल्यामुळे रस्त्यात बंद पडले. इंधनासाठी त्यांनी महेश पंप गाठला, मात्र तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी कोणतीही कारणमीमांसा न देता पेट्रोल देण्यास नकार दिला. परिणामी, ठाकरे यांना वाहन तसाच सोडून पर्यायी वाहनाने घरी परतावे लागले.

सकाळी पुन्हा भेट दिल्यावर कर्मचाऱ्यांची उद्धट प्रतिक्रि

यासकाळी ११ वाजता ठाकरे यांनी पुन्हा पंपावर जाऊन विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी “तक्रार द्यायची असेल तर द्या, आम्हाला काही फरक पडत नाही” अशा उद्दट भाषेत उत्तर दिले. यावरून पंप प्रशासनाची ग्राहकविरोधी आणि दादागिरीची वृत्ती पुन्हा एकदा स्पष्ट झाली.

या घटनेविरोधात ठाकरे यांनी उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे. त्यांनी मागणी केली आहे की –

संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी,दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी,

चौकशी पूर्ण होईपर्यंत पंप तात्पुरता बंद करावा,

लेखी चौकशी अहवाल सादर करण्यात यावा.

प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास ग्राहक संरक्षण विभाग व तेल कंपनीच्या मुख्यालयाकडे हा मुद्दा नेण्यात येईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे.

या वेळी प्रविण नवले, धम्मरत्न वाहने, निखिल किर्दक, अभिषेक ठाकरे, वैभव वानखडे, अतुल गावंडे, प्रज्वल ठाकरे, पवन तळोकार, मुकुंद काळे, हर्षल जाधव आदी उपस्थित होते.

👉 नागरिकांत प्रचंड संताप

चुकून कधी एखादी रुग्णवाहिका किंवा रुग्णासोबत असलेली एखादी टू व्हीलर वर जरी रात्री अपरात्री पेट्रोल पंप वर आली आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांचे असेच मनमानी कारभार असेल तर किती मोठा अनर्थ होऊ शकतो असे प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे.

महेश पंपावरील अशा मनमानी आणि उद्धट वागणुकीचा अनुभव अनेक नागरिकांनी यापूर्वीही घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पावले उचलून हा प्रकार आवरावा, अशी मागणी जोर धरत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!