Join WhatsApp group

मूर्तिजापूर हादरलं! महिलेला घरात घुसून त्रास – तडीपार आरोपींवर गुन्हा दाखल; पोलिसांचा मुळशी पॅटर्न – नागरिकांत समाधान, पण कठोर कारवाईची मागणी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (दि. 22 ऑगस्ट 2025) – मूर्तिजापूर शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे जनतेत भीतीचं वातावरण पसरलं होतं. तडीपार असूनही काही आरोपी शहरात खुलेआम वावरत, महिलांना त्रास देत आणि कायद्याला उघड आव्हान देत होते. अखेर अशाच पाच आरोपींनी महिलेला घरात घुसून शिवीगाळ, विनयभंग व जीव घेण्याची धमकी दिल्याने शहर हादरलं आहे.

फिर्यादी एका विवाहित महिलेने (वय 30, रा. टेलिफोन कॉलनी, मूर्तिजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजता आरोपी सनी दुबे (25), वैभव कोकाटे (24), योगेश कोकाटे (22), आकाश उइके (23) व यश केसले उर्फ चीन्ना (24) यांनी गुंडगिरी करत तिच्या घरात घुसून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. विरोध केला असता आरोपींनी तिचा हात धरून ओढले, ढकलले तसेच मोहल्यातील लोकांसमक्ष अपमान करून जीवाने ठार मारण्याची धमकी दिली.

या गुंडांविरोधात अप क्रमांक 399/2025, कलम 74, 189(2), 189(4), 190, 191(1), 191(2), 296, 333, 351(3) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, हे आरोपी तडीपार असूनही पोलिसांना न घाबरता दहशत माजवत होते. मात्र मूर्तिजापूर पोलिसांनी आता ठोस पावलं उचलून मुळशी पॅटर्न राबवत आरोपींनी जिथे गुन्हा केला तिथेच त्यांची धिंड काढली आणि त्यांचा माज चिरडून टाकला.

या कारवाईनंतर शहरात गुन्हेगारांविरोधात नागरिकांत समाधान व्यक्त होत असले तरी, मूर्तिजापूर शहर शांतिवादी नागरिकांनी अशा गुंडांविरोधात आणखी कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अशा गुन्हेगारांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!