Join WhatsApp group

मुर्तिजापूर ग्रामीण पोलीसांची जुगार अड्ड्यावर धडकचार जणांसह ₹1 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर: दिनांक १० : मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी ग्राम शिवण खु येथील जुगार अड्ड्यावर कारवाई करत चार जणांना ताब्यात घेऊन तब्बल ₹1,22,250/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी अप. क्र. 376/2025, कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटना तपशील :दि. 10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2.00 ते 2.45 वाजताच्या सुमारास पोस्टे. मुर्तिजापूर ग्रामीण येथील पथकाने पंचांसमक्ष शिवण खु येथे जुगार रेड टाकली.

रेडदरम्यान आरोपींच्या ताब्यातून 52 ताश पत्ते, दोन मोबाईल फोन, दोन मोटारसायकली आणि रोख ₹3,250 असा एकूण ₹1,22,250 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपींची नावे :1. पंजाब मधुकर वारकर, वय 53

2. विजय लक्ष्मण कुराडे, वय 30

3. मंगेश हिम्मतराव ताठे, वय 36 — सर्व रा. शिवण खु

4. ओंकार दौलतराव वरघट, वय 65 — रा. वाई

पोलिसांची कार्यवाही :

फिर्याद एएसआय विजय मानकर (ब. क्र. 1190) यांनी नोंदवली असून ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

कारवाईत HC ज्ञानेश्वर रडके, PC शंकर खेडकर, प्रशांत भवाने, गजानन सयाम यांनी सहभाग घेतला.जप्त केलेला सर्व मुद्देमाल पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!