Join WhatsApp group

आषाढी एकादशीनिमित्त मूर्तिजापूर रेल्वे स्थानक दुमदुमले: आमदार हरीश पिंपळे यांनी केले वारकऱ्यांचे भव्य स्वागत!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : ५ जुलै २५ : आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर खास स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. नागपूर-मीराज आणि अमरावती-पंढरपूर आषाढी विशेष ट्रेनमधून येणाऱ्या भाविकांचे आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात यात्रेकरूंच्या सोयीसाठी पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे आणि फळांचे वाटप करण्यात आले. ही सेवा मिळाल्याने वारकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण होते.

रेल्वे कर्मचाऱ्यांचा सन्मान:

या उपक्रमात रेल्वे प्रशासनाच्या योगदानालाही मान देण्यात आला. स्टेशन मास्टर नरेश वानखडे, बुकिंग ऑफिसचे पी. पी. कुलकर्णी, टीसी अक्षय राऊत, आरपीएफचे आशिष महल्ले, कॉन्स्टेबल संदीप तायडे आणि सचिन गुप्ता यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार झाला.

भाजप पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती:

या सेवाभावी उपक्रमात भाजप मूर्तिजापूर शहर व तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यामध्ये कमलाकर गावंडे, हर्षल साबळे, राम जोशी, अविनाशवारकऱ्यांमध्ये समाधानाचा स्वर: यावले, रितेश सबजकार, प्रशांत ठाकरे, गजानन नाकट, दिगांबर सरदार, राहुल तिडके, सुधीर दुबे, मोनालीताई गावंडे, राधाताई तिवारी, अमोल प्रजापती, राहुल पाटील, पप्पू मुळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

वारकऱ्यांमध्ये समाधानाचा स्वर:

या उपक्रमामुळे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांना केवळ सुविधा नाही, तर आपुलकीची भावना देखील अनुभवायला मिळाली. आमदार हरीश पिंपळे यांच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे मूर्तिजापूर रेल्वे स्थानक आषाढी एकादशीच्या दिवशी भक्तीमय आणि सेवाभावी वातावरणाने भरून गेले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!