Join WhatsApp group

मुर्तिजापूर नगराध्यक्ष पदाची निवडणूक : प्रचाराचा शेवटचा दिवस तिरंगी लढतीत तुफान रंगत — भाजप, वंचित आणि शिवसेना (उबाठा) मध्ये सस्पेन्स निर्माण

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : ०१ डिसे.२५ : नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा आज प्रचाराचा अखेरचा दिवस असून तिन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये चुरस शिगेला पोहोचली आहे. भाजपचे हर्षल साबळे, वंचितचे इम्रान शेख आणि शिवसेना (उबाठा) चे विनायक गुल्हाने या तिरंगी लढतीने संपूर्ण शहराचे राजकीय तापमान प्रचंड वाढवले आहे.


मागील निवडणुकीत भाजपचा विजय, विनायक गुल्हाने अल्प मतांनी पराभूत

गत निवडणुकीत भाजपने नगराध्यक्ष पद मिळवण्यात यश मिळवले होते. त्यावेळी शिवसेनेचे विनायक गुल्हाने अत्यल्प मतांनी पराभूत झाले होते. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये यंदा “री-मॅच” जिंकण्याची मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे.


वंचित बहुजन आघाडी — समीकरणांचा गेम-चेंजर?

वंचित बहुजन आघाडी दरवर्षी स्थानिक निवडणुकीत मतांचे समीकरण बदलणारा निर्णायक घटक ठरत आली आहे.
यंदाही शहरात मोठा प्रश्न चर्चेत आहे —
वंचित हे यावेळी स्वतःच्या हितासाठी लढत आहे का, की कुणाच्या तरी राजकीय गणितासाठी?
या प्रश्नाचे गूढ आणि सस्पेन्स अंतिम निकालावर मोठा परिणाम करू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.


भाजपचा आत्मविश्वास कायम, तरुण मतदारांवर भर — आमदार हरीश पिंपळे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

भाजपचे उमेदवार हर्षल साबळे यांच्याबाबत पक्षात कमालीचा आत्मविश्वास आहे.
तरुण मतदारवर्गाचा कल, संघटनेची ताकद, आणि विकासाचा अजेंडा यामुळे भाजपचा मोरचा भक्कम मानला जातो.

यासोबतच आमदार हरीश पिंपळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही उमेदवारी दिल्यामुळे भाजपच्या उमेदवाराकडे आता अधिक उत्सुकतेने सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यांच्या निर्णयामुळे भाजपचा आत्मविश्वास आणखी बळकट झाला असून हे निवडणुकीतील महत्त्वाचे समीकरण ठरत आहे.


शेवटच्या दिवशी तिन्ही पक्षांची जोरदार मोहीम

प्रचाराच्या अंतिम दिवशी रॅली, सभां, गल्लोगल्ली संपर्क मोहीम, तसेच प्रभावी मतदारांशी संवाद याचा धडाका शहरभर पाहायला मिळाला. तिन्ही पक्षांनी आपापल्या बालेकिल्ल्यांमध्ये शेवटची जोरदार मोहीम राबवली.


मतदारांचे मौन वाढवतेय सस्पेन्स

बहुसंख्य मतदार आपली पसंती उघड करत नाहीत.
भाजपची परंपरागत पकड, वंचितचा अनपेक्षित प्रभाव, आणि शिवसेनेचा कट्टर मतदार वर्ग —
या तिन्हींच्या एकत्रित परिणामामुळे शहरात प्रचंड सस्पेन्स निर्माण झाला आहे.


नगराध्यक्ष पदाचा ताज कोणाच्या डोक्यावर बसणार?
याची उत्सुकता शिगेला असून निकाल पेटीत लपला आहे — आणि तो उघडण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!