Join WhatsApp group

मुर्तीजापूर : अवघाते बाल रुग्णालयात शासकीय योजनांमध्ये गैरप्रकार? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर (प्रतिनिधी) – शहरातील अवघाते बाल रुग्णालयावर गंभीर गैरप्रकाराचे आरोप होत असून काही समाजसेवक व बुद्धिजीवी नागरिकांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत होत असलेल्या अनियमितते बाबत आहे.

तक्रारीनुसार — 1. परवानगीचा दुरुपयोग – डॉक्टर प्रशांत अवघाते यांनी एका हॉस्पिटल साठी मिळवलेली परवानगी दोन्ही हॉस्पिटलमध्ये वापरून योजना चालवल्याचा आरोप आहे.

2. मल्टीस्पेशालिटी परवानगीचा वापर – अवघाते बाल रुग्णालयाची मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठीची परवानगी दुसऱ्या अवघाते हॉस्पिटलमध्येही वापरली जात असल्याची बाब तक्रारीत नमूद आहे.

3. रुग्णांवर दबाव – रुग्णांना स्वतःकडे तपासणीसाठी येण्यास भाग पाडणे व औषधे रोख रकमेने विक्री करून त्याचा हिशोब शासकीय योजनांमध्ये लावण्याचे प्रकार केल्याचा आरोप आहे.

4. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव – लॅबमध्ये कोणतेही प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले गेले आहे.

5. अतिक्रमणाचा आरोप – महात्मा फुले योजना कार्यालय हे अतिक्रमित जागेत चालवले जात असल्याचे नमूद केले आहे.

6. अतिरिक्त वसुली – प्लेटलेट प्लाझ्मा सुविधा नसताना रुग्णांकडून गरजेनुसार २२०० रुपये अतिरिक्त घेतल्याचा आरोप आहे.

तक्रारकर्त्यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता जिल्हा प्रशासन व शासन या प्रकरणात काय भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!