Join WhatsApp group

मुर्तीजापूर हायस्कूल मागील लेआउट बनले ‘युवा तळीरामांचे अड्डे’ — स्थानिक नागरिक त्रस्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

शाळा म्हणजे विद्याचा मंदिर, समोर शाळा आणि मागे युवा तळीरामांचे अड्डे’

मुर्तीजापूर (प्रतिनिधी) – दिनांक २४ ऑक्टो. २५ :
मुर्तीजापूर हायस्कूलच्या मागील लेआउट परिसरात रात्रीच्या वेळी काही तरुणांकडून दारू आणि गांजाच्या व्यसनाचे सत्र सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. अंधाराचा फायदा घेत हे तरुण नियमितपणे येथे जमून उशिरापर्यंत अराजक माजवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

नगरपरिषदेकडून या भागात बसवण्यात आलेल्या प्रकाशयोजनेचा लाभ घेऊन हे तरुण आरामात बसून दारू सेवन, धूम्रपान आणि गलिच्छ भाषा वापरण्याचे प्रकार करतात. त्यामुळे आसपास राहणाऱ्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावरून रात्री उशिरा ये-जा करणाऱ्या महिलांनाही या रस्त्यावरून ये जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. या भागात उच्चभ्रू नागरिकांची वस्ती असूनही, रहिवासी भीतीपोटी किंवा गैरसोयीच्या कारणामुळे पोलीस स्टेशनपर्यंत तक्रार देण्यास टाळाटाळ करतात आणि गप्प राहतात. त्यामुळे दररोज या परिसरातील नागरिकांना या असामाजिक प्रकारांचा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी सरकार न्यूजच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडे या परिसरात रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग वाढवावे आणि अशा गैरप्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!