Join WhatsApp group

मुर्तिजापूर शहर पोलिसांनी आरोपी अटक करून दोन गोवंशांना दिले जीवन दान

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २६ जून २५ : मुर्तिजापूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गायींची कत्तल करून त्यांचे गोमांस विकण्याचा अवैध व्यवसाय सुरू आहे. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक हे गोमांस तस्करी आणि गोमांस तस्करी करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

पोलिस अधीक्षकांनी सर्व पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय करू नये असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत.

आज दुपारी १ वा. सुमारे पोलिस निरीक्षक आशिष शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली की एक टाटा एस( MH ४६ एफ ४८८४) मुर्तिजापूर येथे गोवंशना कत्तल साठी घेऊन जात आहे.

तत्परता दाखवत ठाणेदार अजित जाधव यांनी पोलिसांनची टीम गठित करत जाळे लावून आरोपी अब्दुल वाहिद मोहम्मद जाहीद (रा.टाकली ता. दर्यापूर, वय ३० अंदाजे) याला वाहनसह दर्यापूर नाक्या जवळ अटक करून दोन गोवंशना जीवनदान दिले.

सदर कारवाई करताना पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर राणे, हरिदास सोळंके,पंढरीनाथ पोळे, इरफानुद्दीन यांचा समावेश होता.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!