Join WhatsApp group

मूर्तिजापूर शहर पोलिसांनी गोवंश चोरट्यांना वर केली सुपरफास्ट कारवाई

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर : दि.११: तालुक्यातील गोवंश चोरून निर्दयीपणे कत्तली नेतांना व गोमांस विक्री करणाऱ्यांवर मुर्तीजापुर पोलिसांची कारवाई अलीकडच्या काही दिवसापूर्वीच झाली.

तरी गोवंश चोरट्यांना कायद्याचा धाक राहिलाच नाही त्यात पुन्हा शहरातील गोयंका नगर परिसरातून चक्क पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये ७ जानेवारीच्या रात्री ३.२० वाजेदरम्यान एका इसमाच्या गोठ्यातून एक दुधाळ गाय व एक गोऱ्हा अज्ञात इसमांनी चोरून नेला.

या प्रकरणी शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेचा दोन दिवसात छडा लावून दोन आरोपींना दुधाळ गाय, गोऱ्हा व मुद्देमालासह सापळा रचून ९ जानेवारीला अटक केली.शहरातील गोयंका नगर रहिवासी शेतकरी सुभाष सुदाम बाजड (कवठा सोपीनाथ) वय ६० हे ग्रामीण भागातील असल्याने दही दुभत्या साठी घरी गाय पालन करीत असे.

या गुन्ह्यातील आरोपी शेख अलफैन उर्फ सोहेब शेख इरफान वय २३ रा. फिरदोस कॉलनी अकोला,मोसीन शहा अब्दुल शहा वय ३२ रा. इक्बाल कॉलनी अकोला या दोघांनी ७ जानेवारीच्या रात्री ३:२० दरम्यान घरातील टिनाच्या गोठ्यातून दुधाळ गाय किं. ६० हजार रू.गोऱ्हा किं. ७० हजार रू. असा एकूण १ लाख ३० हजाररूपायांचा मुद्देमाल अज्ञात ३ ते ४ इसमांनी एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये जनावरांना कोंबूनटाकून चोरून नेली आहे.

अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव, उपनिरीक्षक आशिष शिंदे, अंमलदार मुन्ना पांडे, सचिन दांदळे, नंदकिशोर टिकार, पो.कॉ. सचिन दुबे, मंगेश विल्हेकर, गजानन खेडकर, नामदेव आडे यांनी सदर गुन्ह्याचे तपासात यातील आरोपीतांना पो. स्टे. चे गुन्हे शोध पथकाचे मदतीने दोन दिवसात अटक करून कार्यवाही करण्यात आली.

आरोपीजवळून गाय व गाडी क्रं. एमएच ३० सी.जे. ६२१२ किंमत ४ लाख रू व २ मोबाइल फोन किंमत ५० हजार रू. असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.व इतर आरोपींचा शोध शहर पोलीस करीत आहे. अधिक तपास पोउपनि आशिष शिंदे करीत आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!