Join WhatsApp group

कुत्र्याला दगड मारला म्हणून ग्राम उमई मध्ये खून

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर, दि. २८ :मुर्तीजापूर तालुक्यातील ग्राम उमई येथे आज सकाळी जुन्या वैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा खून झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गजानन विश्वास मानकर (रा. उमई) याचा मृतक दिपक अवधुत वानखडे व जखमी श्रीराम पांडोजी वानखडे यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी कुत्र्याला दगड मारण्याच्या कारणावरून वाद झाला होता.

त्यावेळी आरोपीने “बघून घेईल” अशी धमकी दिली होती. या पूर्ववैमनस्यातून आज सकाळी ८.०० ते ८.३० वाजताच्या सुमारास आरोपीने हल्ला चढवला.या हल्ल्यात दिपक वानखडे यास विळ्याने पोटात वार करून ठार मारण्यात आले.

तर श्रीराम वानखडे यास जीव घेण्याच्या उद्देशाने हातावर व पोटावर लोखंडी विळा व काठीने प्रहार करण्यात आले. यात तो गंभीर जखमी झाला आहे.

➡️ मृतकाचे प्रेत उत्तरिय तपासणीसाठी लक्ष्मीबाई देशमुख ग्रामीण रुग्णालय, मुर्तीजापूर येथे पाठविण्यात आले असून जखमीला १०८ अॅम्बुलन्सने त्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

➡️ पोलिसांनी तातडीने आरोपीस ताब्यात घेतले असून सध्या ग्राम उमई येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ही कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चीत चांडक, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. चंद्रकांत रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहभागी अधिकारी व अमलदार :स.पो.नि. श्रीधर गुटटे, पो.उपनि. चंदन वांखडे, पो.हवा. मनीष मालठाणे, पो.हवा. राजेश डोगरे, पो.हवा. गणेश गावंडे, पो.कॉ. रितेश मदत, पो.कॉ. गजानन सयाम, पो.कॉ. अंकीत टोंगे, पो.कॉ. अनुप बुचे, पो.कॉ. रामहरी केंद्रे व पो.कॉ. गणेश ठाकरे उपस्थित होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!