Join WhatsApp group

एका बातमीने शहरात राजकीय भुकंप

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा मुर्तीजापुर – १३ ऑक्टोबर २४ – शहरात उदरनिर्वाह करण्यासाठी आलेल्या आसाम मधल्या मुलीचा खून काही महिन्यांपूर्वी प्रतिक नगर येथे झाला असून आरोपी सध्या फरार असून त्या संधर्भात डिजिटल मिडिया च्या एका पोर्टलच्या माध्यमातून त्या झालेल्या खुनावर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले असून त्या मध्ये राजकीय नेते मंडळी व त्यांचे सहकारी सहभागी असल्याचा दावा या बातमी मध्ये करण्यात आला होता.

त्या नेत्याला ब्रेंडेड दारू सोबत आंबट शौक करायला पण आवडतात, दारूचा नशेत समोरील स्त्री कोण व तिचे वय किती कदाचित ती आपल्या मुलगी एवढी तर नाही ना ! याचे सुद्धा त्या नेताजीला दारू पेल्यावर भान राहत नाही. असे सूत्रांचा आधारे समजते.

काल जे वृत्त डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून लिंगपिसाट नेत्याचं व त्याचा सहकारी मित्राचा भांडा फोड झाला त्यामुळे शहरात या प्रकरणाची चांगली चर्चा रंगली असून निवडणुकीचा फायदा घेत काही विरोधी पक्ष नेते मंडळी या प्रकरणाची संधी साधून विराट मोर्चा काढण्याचा तयारीत दिसत आहे. आता हा मोर्चा कदी काढण्यात येतो? कोणता विरोधी पक्ष नेता काढतो ? या प्रकरणाचा येणाऱ्या निवडणुकीत किती फायदा कोणता नेता घेतो? त्या मुलीला निवडणुकीची संधी साधून न्याय मिळतो कि फक्त राजकारण हे पाहणे रोचक झाले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!