Join WhatsApp group

खुनाच्या आरोपीस अवघ्या दोन तासांत अटक स्थानीक गुन्हे शाखा व पिंजर पोलीस पथकाची संयुक्त धडक कार्यवाही

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला: दिनांक ०३ सप्टेंबर २४ : पिंजर पोलीस ठाणे हद्दीतील टीटवा गावात मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणातील आरोपीस पिंजर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अवघ्या दोन तासांत अटक करून गुन्हा उघडकीस आणला.

दिनांक २ सप्टेंबर रोजी रात्री १० ते १२.१५ वाजण्याच्या दरम्यान ग्राम टीटवा येथील बबन रामराव राऊत (वय ५५) यांचा त्यांच्या पुतण्याने व मुलानेच काठीने मारहाण करून तसेच दोरीने गळा आवळून खून केला. या प्रकरणी बळीचा भाऊ फिर्यादी विनोद रामराव राऊत यांनी पिंजर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा क्रमांक २३२/२५ भा. दं. सं. कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

घटनेनंतर आरोपी नवनाथ बबन राऊत (वय २७) हा पळून गेला होता. आरोपीकडे मोबाईल नसल्याने शोधमोहीम आव्हानात्मक ठरली. मात्र, पिंजर पोलीस स्टेशनचे तीन स्वतंत्र पथक व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कसून शोध घेतला. आरोपी रात्रीभर शेतात लपून बसला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शेलू (जि. वाशीम) येथून संभाजीनगर, पुणे दिशेने निघाला असता गोपनीय माहितीच्या आधारे त्यास पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, व पोलीस निरीक्षक शेळके (स्थागुशा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पिंजर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी गंगादार दराडे, साई अभिषेक घरे, साई गोपाल जाधव, जीपीसी दशरथ बोकर, एचसी गोकुळ पक्ष, अन्सार शेख, स्वप्नील खेडकर, चालक मनीष ठाकरे, एचसी देव मोरे, एचसी नागसेन वांदीप, एचसी गजानन, एचसी नागेश दांदी, पीसी नरहरी देवकते, पीसी भूषण मुखमले, पीसी भागवत गांजवे, पीसी मयूर खडसे, एचजी नजीर हुसैन, एचजी गणेश जानोरकर यांनी सहभाग घेतला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!