Join WhatsApp group

Ads

मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी नगरपरिषदेची अभय योजना; ३१ मार्चपर्यंत लाभ घेण्याचे आवाहन

By Sarkar Maza

February 19, 2026 8:32 am

Ads

मुर्तिजापूर : दिनांक 19: मुर्तिजापूर नगर परिषद हद्दीतील थकित मालमत्ता कर धारकांसाठी शास्ती माफी अभय योजना लागू करण्यात आली असून नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १५० अ (१) मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार मालमत्ता करावरील शास्ती अंशतः किंवा पूर्णतः माफ करून कर वसुलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शासनाने ही योजना मंजूर केली आहे. शासन निर्णय क्रमांक एमयूएम-२०२५/प्र.क्र.७०/नवि-१७ अनुषंगाने मुर्तिजापूर नगर परिषद क्षेत्रात ही अभय योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत थकित मालमत्ता कर धारकांनी शास्ती व व्याजाची रक्कम वगळून मूळ थकबाकीचा भरणा करून दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन नगराध्यक्ष हर्षल साबळे तसेच मुख्याधिकारी निलेश जाधव यांनी केले आहे.

नगर परिषदेकडून नागरिकांनी मुदतीत कर भरून योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!