Join WhatsApp group

प्रकाश वाट प्रकल्पाच्या वाचनालयातून विद्युत सहाय्यक पदापर्यंत वाटचाल!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर (प्रतिनिधी):मुर्तीजापुर शहरातील प्रकाश वाट प्रकल्प संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेल्या वाचनालयाचा मोठा लाभ होत आहे. या वाचनालयात विविध शैक्षणिक, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकांची सुविधा असून, अनेक होतकरू विद्यार्थी येथे नियमित अभ्यास करतात.

या वाचनालयाचा अभ्यासासाठी वापर करून, मुर्तीजापुर शहरातील तैकीर खान मसरूर खान यांनी विद्युत सहायक (महापारेषण) या पदावर यशस्वी निवड मिळवली आहे.

त्यांच्या निवडीने शहरात, प्रकाश वाट प्रकल्प संस्थेत आणि त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

तैकीर खान यांनी यशानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “माझ्या यशामध्ये प्रकाश वाट प्रकल्प वाचनालयाचे मोलाचे योगदान आहे.

या प्रकल्पाचे संस्थापक, माजी नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे, आमदार हरीश पिंपळे व इतर सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी जे पायाभूत कार्य केले आहे, त्याचे फळ आम्हाला मिळते आहे.

यशाचे संपूर्ण श्रेय मी या संस्थेला आणि माझ्या कुटुंबाला देतो.”प्रकाश वाट प्रकल्प वाचनालयामुळे अनेक विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली असून, यामधून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनीही उज्वल भविष्य घडवावे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!