Join WhatsApp group

२४ तासात मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस; दोघा चोरट्यांना अटक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला (दि. ३० जून २०२५): पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अकोला येथील डिटेक्शन ब्रँच (डी.बी.) पथकाने अतिशय कौशल्याने आणि जलदगतीने तपास करत केवळ २४ तासात मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दि. २९ जून २०२५ रोजी अल्ताफ बेग अनवर बेग (वय २४, रा. अकबर प्लॉट, पातुर, जि. अकोला) यांनी तक्रार दिली होती की, त्यांनी त्यांच्या होन्डा शाहीन कंपनीच्या मोटारसायकल (क्र. MH-30-BZ-0472) आझाद कॉम्प्लेक्स, गांधी रोड, अकोला येथे उभी करून कपड्यांची खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. यावरून सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. २०४/२०२५, कलम ३७९ भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करताना डी.बी. पथकाला गुप्त माहितीच्या आधारे दोन संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी:

१) अब्दुल रख अब्दुल नासीर (वय २५, रा. मुजावरपुरा, बार्शीटाकळी)
२) गोहसीन खान जकीउल्ला खान (वय २५, रा. दहेडबेस, बार्शीटाकळी)

यांना अटक केली. चौकशीत त्यांनी मोटारसायकल चोरण्याची कबुली दिली. त्यांनी चोरीस गेलेली मोटारसायकल एका महिंद्रा अॅपे वाहनामध्ये टाकून नेल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला:

  • होन्डा शाहीन मोटारसायकल (क्र. MH-30-BZ-0472) किंमत सुमारे ₹१,००,०००
  • गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा अॅपे वाहन (क्र. MH-30-AB-4241) किंमत ₹८०,०००

एकूण मुद्देमाल: ₹१,८०,०००

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर), श्री. सतीष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक संजय गवई यांच्या नेतृत्वात पार पडली. ही कारवाई सहा. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बहादुरकर, पो.ह.वा. अजय भटकर, उवाजा शेख, किशोर बेजल, पो.कॉ. शैलेश घुगे व तुषार आपर्डे यांनी केली.

सिटी कोतवाली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्हा उघडकीस आणून पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास जिंकला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!