Join Whatsapp

मोटर चोर माना पोलिसांच्या ताब्यात

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा : दिनांक ४ : मूर्तीजापुर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या कुरुम या गावी विहिरीतील मोटर चोरी झाल्याची घटना 29 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.

याप्रकरणी माना पोलिसांनी चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दोन मोटर हस्तगत केल्याचे समजते.

कुरम येथे रहिवासी असलेले अभिजीत देशमुख वय 45 यांच्या शेताच्या विहिरीतील दोन पाणबुडी मोटर चोरून नेल्याची घटना, शुक्रवारी सकाळी शेतात गेले असता उघडकीस आली. या घटनेची फिर्याद त्यांनी माना पोलीस स्टेशनला दिली. प्रत्यक्षदर्शीने काही जणांना मोटर दुचाकीने नेत असल्याचे बघितले होते.

त्यावरून माना पोलिसांनी घटनेचा मागोवा घेतला कुरूम परिसरात दोन वर्षांपूर्वी अनेक शेतकऱ्यांच्या 15 मोटर व स्प्रिंकलर नोजल चोरी झाल्याची घटना घडली होती.

त्याचा अद्यापही शोध लागला नव्हता माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरवसे यांनी सहकारी उपनिरीक्षक गणेश महाजन, अंमलदार दीपक सोळंके, अविनाश बोरसे, उमेश हरमकर, यांनी सापळा रचून आरोपी साकिब खान मजीद खान, नौशाद खान रफिक खान, जावेद खान रशीद खान, व एक अनोळखी आरोपी यांना अटक केली.

याप्रकरणी माना पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास ठाणेदार सुरज सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे, अंमलदार आकाश काळे हे करीत आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!