Join WhatsApp group

सावधान लहान मुलांना ठेवा मोबाईल पासुन दुर !होऊ शकतात गंभीर मानसिक शारीरिक आजार

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मोबाइलचे जसे चांगले फायदे आहेत, तसेच तोटे देखील आता समोर येऊ लागले आहेत. दीड-दोन वर्षाच्या चिमुकल्याच्या हाती देखील आता मोबाईल दिसू लागला आहे. घरातील कामे करीत असताना मुलगा चिडचिड करू नये म्हणून आईच त्याच्या हाती मोबाईल देऊ लागली.

पालक देखील मुलगा रडायला की त्याच्या हाती मोबाईल देत आहेत. मुलगा जेवत नाही, घरात पसारा करतो म्हणूनही अनेक जण चिमुकल्याला मोबाईल देतात. मात्र, मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांच्या अवयवांसह त्यांच्या शारीरिक व मानसिकतेवरही दूरगामी परिणाम होतात ही वस्तुस्थिती आहे

लहान मुलांना गप्प किंवा शांत बसविण्यासाठी त्यांच्या हाती मोबाईल दिला जातो. पण, ते एकाच ठिकाणी बसून मोबाईलवर काहीही पाहतात. त्यावेळी मान अवघडते. याशिवाय हातात मोबाईल असल्याने व कोणत्याही स्थितीत तासन्‌तास बसून राहिल्याने पाठदुखीचाही त्रास त्यांना पुढे काही दिवसांनी उद्‌भवू शकतो.

तसेच मोबाईलच्या अतिवापराने दृष्टीदोष निर्माण होण्याची भीती आहे.परिणामी बालवयातच चष्मा लागू शकतो. नैसर्गिकरित्या दिलेले डोळे जपणे जरुरी असते. पण, आता सर्रासपणे लहान मुलांच्या हाती मोबाईल दिसतो. स्क्रीन टाइम जेवढा जास्त, तेवढा त्यांच्या डोळ्यावर परिणाम होऊन पुढे दृष्टिदोष उद्‌भवतो.अंधूक दिसणे, डोके दुखण्याचा त्रास सुरू होते. त्यावेळी त्या लहान मुलाला चष्मा लावावा लागतो. डोळ्यावर ताण पडल्याने डोकेदुखीचा त्रास पुढे आयुष्यभर पिछा सोडत नाही.

मुलांची कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, क्रियाशीलता व बुद्धिमत्ता लहान वयातच वाढत असते. त्याच वयात त्यांच्या हाती मोबाईल दिल्याने सतत काहीतरी गेम्स्‌ खेळण्यामुळे त्यांना चांगल्या गोष्टी सुचत नाहीत आणि त्यामुळे क्रियाशीलता कमी होते.मोबाइलमुळे सांघिक मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होते, व्यायाम नसल्याने लठ्ठपणा वाढतो. अभ्यासातील लक्ष कमी होते आणि तो मुलगा मोबाइलच्या आहारी गेल्याने मेंदूवरही दुष्परिणाम होऊ शकतात.हाताचे स्नायू आखडतातलहान मुलांना शाळेत लिखाण करायचे असते. परीक्षेत लिखाणाशिवाय जास्त गुण अशक्यच. पण, लहानपणापासून हाती सतत मोबाईल राहिल्याने हाताचे स्नायू आखडून लिखाणाची गती मंदावू शकते. त्यांची मोबाईल घेऊन बसण्याची स्थिती व्यवस्थित नसल्याने पाठीचा कणा ताठ रहात नाही. त्यानंतर त्याला पाठदुखीचा त्रास लहानपणापासूनच सुरू होतो.

हिंसात्मक वृत्तीला मिळते चालना

सध्या मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारच्या शेकडो ऑनलाइन गेम्स्‌ उपलब्ध आहेत. लहान मुलांचा सर्वाधिक कल फायटर गेम्सकडे असतो. अशा खेळांमुळे हिंसात्मक विचाराला खतपाणी मिळते. त्यानंतर चिडचिडपणा वाढतो, पुढे जाऊन अशी मुले एकलकोंडी बनतात.पालकांनी करावेत हे उपायस्मरणशक्ती वाढविण्यासाठी खेळ, कलेची आवड निर्माण करावी.मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी हाती मोबाईल देवू नये.पालकांनी स्वत: घरी असताना मोबाइलचा वापर कमी करावा.तर्कशक्ती, स्मरणशक्ती वाढेल, असे खेळ पालकांनी स्वत: मुलांसोबत खेळावे.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!


Share

Leave a Comment

error: Content is protected !!