Join WhatsApp group

हिन्दुस्थानच्या भाग्योदय, युगपुरुष शिवप्रभूंच्या चरित्र डोळ्यासमोर ठेवा आमदार सावरकर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १९ : अकोला : १९ फेब्रुवारी १६३०. इतिहास घडविणारा सुवर्ण दिन. स्थळ.. किल्ला शिवनेरी. जुन्नर जि. पुणे. आजच्या दिवशी हिन्दुस्थानाचा भाग्योदय करणाऱ्या बाळ राजांचा जन्म झाला. गडावर जल्लोश झाला. सनई चौघडे वाजू लागले. लोक एकमेकांना मिठाई वाटू लागले.

अत्याचारग्रस्त भारतीयांचा आर्त टाहो अखेर देवीने ऐकला. या किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरुन राजमाता जिजाबाईंनी बाळराजेंचे नामकरण केले शिवाजी महाराज. मराठी भाषेला अभिजीत दर्जा देणारे महापुरुष होते.

त्याचा इतिहास प्रत्येकाने अंगीकार करावा या देशाची ओळख शिवाजी महाराज मुळे आहे त्याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात शिवाजी जयंती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने आग्रा किल्ल्यावर*शिवाजी जयंती साजरी करण्याचा तसेच गड किल्ले याचा विकास करण्याचा निर्णय घेतला असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस विधिमंडळ प्रतोद रणधीर सावरकर यांनी केले.

राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात व ग्रामीण भागात शिवाजी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात शिवाजी महाराजांना अभिवादन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयंत मसने हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार अनुप धोत्रे, किशोर पाटील विजय अग्रवाल, धनंजय धबाले मनीराम ढाले पंकज वाडीवाले प्रशांत अवचार विवेक भरणे माधव मानकर मिलिंद राऊत अनिल नावोकार गीतांजली शेगोकार, संदीप गावंडे , मोहन गावंडे रश्मी अवचार, सुमन ताई गावंडे, एडवोकेट देवाशिष काकड ,सजयगोटफोडे, पवन महाले , चंदाताई शर्मा, चंदाताई ठाकूर , सारिका ताई जयस्वाल वैशालीताई शेळके, रमेश अल्करी, आम्रपाली उपरवट , अंबादास उमाळे, डॉक्टर अमित कावरे , रमेश करिअर निलेश निनोरे दिलीप मिश्रा एडवोकेट शंकरराव वाकोडे राजेश बेले राजेश नागमते विठ्ठल वाकोडे मधुकर पाटकर संतोष शिवरकर संतोष पांडे, गणेश अंधारे राहुल देशमुख सिद्धार्थ शर्मा एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर डॉक्टर किशोर मालोकार, आधी प्रामुख्याने उपस्थित होते. *या दिवसाचे एवढे महत्त्व की हा दिवस हिन्दुस्थानात शिवप्रभूंच्या पराक्रमाच्या आठवणीनी चैतन्य निर्माण करतो.

आज सर्वत्र आनंदाने भगवे ध्वज डौलात फडकत आहेत. रस्ते रांगोळ्यांनी सजलेत. गावोगावीच नाही तर विदेशातही हारफुलांनी सजलेल्या शिवप्रतिमांसह आज शोभायात्रा संपन्न होणार ही महाराष्ट्रातील जनतेसाठी गर्वाची आणि अभिमानाची बाब आहे अशीही आमदार सावरकर म्हणाले. शिवकालीन शस्त्रासह मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके होणार.

भक्तीभावाने छत्रपती शिवप्रभूंच्या प्रतिमांचे पूजन.,. आरती होणार. माझे.. माझ्या देशाचे नाव कायमस्वरुपी अबाधीत ठेवण्याचा आनंद छत्रपतींच्या पराक्रमाचे पोवाड्यातून व्यक्त होत देशप्रेम जागृत करणार.* *छत्रपती शिवाजी महाराज. जगातील आदर्शांचेही आदर्श. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारताच स्फुरण चढते. अशा जयंती महापुरुषाची जयंती साजरी करण्याची संधी आपल्याला मिळाली ही आपल्या सारख्या लहान सामाजिक कार्यकर्त्याला गर्व सोबत आनंददायी बाब असल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले. भारतीय संस्कृती.. हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष रोमांचीत करतो.

शुन्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे नेमके काय, पराक्रम म्हणजे काय, रामराज्य म्हणजे काय याची उत्तरं छत्रपतींच्या चरित्रात मिळतात. असे याप्रसंगी किशोर पाटील म्हणाले. महाराजांचा जयजयकार म्हणजे त्यांचा अतुलनीय पराक्रम.. जिद्द.. राजकारण.. धर्मप्रेम, देशप्रेम, मुत्सदेगीरी.. लोकोपयोगी उपक्रम अशा अनेक गुणांचे स्मरण.. उजळणी.

*शत्रू कितीही बलाढ्य.. शस्त्र अस्त्र संपन्न.. कपटी, अत्याचारी असो.. परिस्थीती कितीही बिकट उदभवो पण बुद्धीबळाने त्यावर मात कशी करावी हे सांगणारा शिवजयंतीचा उत्सव असल्याचे विजय अग्रवाल यांनी सांगितले.* *कुतुबशाही.. आदिलशाही, निजामशाही इ. परकीय बलाढ्य शस्त्रसंपन्न शत्रूने देशभरात पाशवी अत्याचाराचा कळस गाठला होता. सनातन हिंदू धर्मावर आक्रमण केले होते. धर्मस्थळांचा विध्वंस सुरु होता. संपूर्ण देश भयभीत होता. पण पाशवी अत्याचाराविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य कुणात नव्हते.*

*पण.. पण तो आजचा सोनेरी दिवस उगवला. किल्ले शिवनेरीवरचे सनई चौघड्याचे सुर मराठी मातीला निडरपणे जगण्यासाठी आश्वस्थ करत होते. राजमाता जिजाबाईंनी रामराज्य आणणाऱ्या या युगपुरुषाला जन्म दिला. कित्येक वर्षें पारतंत्र्यात खिचपत पडलेले हे भारतवर्ष आनंदले. शिवनेरीवर इतिहासाची मुहुर्तवेढ रचली जात होती, यामुळे संपुर्ण देश हर्षोल्हासीत झाला.*होता असे प्रतिपादन विजय अग्रवाल यांनी केले ‌ .

*राजमाता जिजाबाईंनी बाळराजेंना देशाची भीषण अवस्था समजावली. बालवयात प्रभू श्रीराम.. श्रीकृष्णाच्या पराक्रमाचे संस्कार केले. शस्त्रविद्या शिक्षणाची व्यवस्था केली.. राजकारण समजावले. देशहितासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न सांगितले. असे सुमन ताई गावंडे यांनी याप्रसंगी सांगितले.*

*छत्रपतींनी या स्वप्नपूर्तीसाठी वेळोवेळी संकटांचा निडरपणे सामना केला. धैर्याने संकटाना सामोरे गेले. राजमातेच्या समोरच इतिहास घडला. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. असामान्य कर्तुत्वशाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाचा.. आदर्श राजकारणाचा.. समाजकारणाचा.. लोकहितकारी राज्यकारभाराचा जगभरात अभ्यास होत राहतो. त्यापासून प्रेरणा जगभर घेण्यात येते असे यावेळी गीतांजलीताई शेगोकार यांनी सांगितले. .*

*छत्रपती शिवाजी महाराज हे भारतभूमीचे दैवत. त्यांनी जीवनातील प्रत्येक क्षण जनतेचे संरक्षण.. न्याय देण्यासाठी खर्च केला. रामराज्य निर्माण करणारे हे श्रीमंत योगी राजे ठरले.* *भारतीय संस्कृतीत सामान्य घरातील बाळाच्या जन्माचा पाळणा गायला जातो. हे तर राजे शिवप्रभू. मग पाळणाही त्याच योग्यतेचा.*

*सनातन भारतीय संस्कृतीला अपेक्षित सर्वांना न्याय देणारे.. सुराज्य आणणारे ‘जाणता राजा’, समस्त देशवासियांचे आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभूंना वंदन.. मानाचा मुजरा.

अशा शब्दात भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने*यांनी अभिवादन करून आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालक गिरीश जोशी तर प्रास्ताविक माधव मानकर तर आभार प्रदर्शन संजय गोटफोडे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शितल जैन, अभिजीत बांगर, मनोज शाहू , प्रकाश अग्रवाल नवीन जाधव, कैलास रणपिसे एडवोकेट कुणाल शिंदे, विनोद मापारी, हरीश काळे, गोपाल मुळे एडवोकेट नितीन गवळी, केशव हेडा केशव पोद्दार, वसंता मानकर, अजय शर्मा विजय इंगळे, सतीश ढगे, गिरीराज तिवारी, विपुल घोगरे, गणेश तायडे, किशोर कुचके, देवेंद्र देवर, विठ्ठल चतरकर राजेश ठाकरे आदींनी अथक परिश्रम घेतले. ,


Share

Leave a Comment

error: Content is protected !!