Join WhatsApp group

पावसाळी अधिवेशनात आमदार रणधीर सावरकर यांचा ठसा – ३५हून अधिक प्रश्नांद्वारे लोकहिताच्या मुद्द्यांना वाचा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

पावसाळी अधिवेशनात आमदार रणधीर सावरकर यांचा ठसा – ३५हून अधिक प्रश्नांद्वारे लोकहिताच्या मुद्द्यांना वाचा

अकोला :भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि विधीमंडळातील प्रमुख प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी 2025 च्या पावसाळी अधिवेशनात अभ्यासू व प्रभावी भूमिकेने जनतेच्या समस्या अधोरेखित केल्या.

लोकशाहीतील महत्त्वाच्या संसदीय साधनांचा प्रभावी वापर करत त्यांनी शिक्षण, आरोग्य, शेती, संघटित गुन्हेगारी, शिक्षकांचे प्रश्न तसेच नागरी सुविधा यासंदर्भातील ३५ पेक्षा अधिक लक्षवेधी व तारांकित प्रश्न सभागृहात मांडले.ग्रामीण व शहरी भागातील नागरी सुविधा पुरवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळावा यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न करत शासनाकडे ठोस मागणी केली. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची फसवणूक, आरोग्यसेवा यामधील त्रुटी, संघटित गुन्हेगारीविरोधातील कारवाईसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर सावरकरांनी आवाज उठवला.सभागृहात केवळ मुद्दे मांडणे नव्हे, तर आवश्यक ठिकाणी आक्रमक भूमिका घेत, अभ्यासपूर्वक व सर्वसामान्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहत त्यांनी विरोधकांनाही आपल्या कृतीतून उत्तर दिले.

कायदे करताना सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून त्यांच्या हस्तक्षेपाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.अधिवेशनभर त्यांनी जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर तोडगा निघावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील भूमिका घेतल्याचे दिसून आले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!