Join WhatsApp group

बोगस बियाण्यांच्या समस्येवर आमदार हरीश पिंपळे यांचा पुढाकार

Photo of author

By Sarkarmzanews

Share

शेतकरी संवाद ५ जुलै रोजी लकडगंज येथे

मुर्तिजापूर : २जुलै २५: सध्या खरीप हंगामाची पेरणी जोरात सुरू असताना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका बसत आहे.

बोगस बियाणे खरेदी करून पेरणी केल्यानंतर आठवडा उलटूनही पीक उगवले नसल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे.

या पार्श्वभूमीवर ‘सरकार माझा न्यूज’ माध्यमाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून, याची गंभीर दखल आमदार हरीश पिंपळे यांनी घेतली आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी ५ जुलै २०२५ शनिवार रोजी लकडगंज जुन्या वस्तीतील कार्यालयात शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या संवादात आमदार पिंपळे स्वतः शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून, संबंधित अधिकाऱ्यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.

आमदार पिंपळे यांनी आवाहन केले आहे की, बोगस बियाण्यांमुळे त्रस्त असलेले शेतकरी आपली समस्या लेखी स्वरूपात घेऊन यावीत, तसेच पूर्वी कृषी विभागाकडे दिलेल्या तक्रारींच्या प्रतीही सोबत आणाव्यात, जेणेकरून समस्या अधिक ठोसपणे मांडता येतील.

हा संवाद मेळावा शेतकऱ्यांसाठी योग्य व्यासपीठ ठरेल आणि त्यातून सकारात्मक तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!