Join WhatsApp group

गोरगरीब रुग्णांसाठी आलेला निधी परत गेल्याने आमदार हरीश पिंपळे विधानसभेत आक्रमक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक : ०५ : मुंबई : मुर्तिजापूर बार्शीटाकळी मतदार संघाचे आमदार हरीश पिंपळे नेहमी रुग्ण सेवे बद्दल नेहमी काळजी पूर्वक लक्ष देत असतात.विधासभेत आज त्यांनी अकोला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम आर आय टेस्ला मशीन—३ या वर प्रश्न उपस्थित केला.

काय आहे संपूर्ण प्रकरण–

अकोला जिल्हा शासकीय महाविद्यालय व सर्वोच्च रुग्णालयात उपचारासाठी दररोज शेकडो रुग्ण येत असतात. एम आर आय थ्री टेस्ट ला मशीन तिथे नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होते असते हे मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव 2017 मध्ये वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग यांच्याकडे पाठवण्यात आला असून सदर मशीन खरेदीसाठी शासनाने 10 कोटी 90 लाख इतका निधी दिला होता.

परंतु मर्यादित वेळेत मशीन न खरेदी केल्यामुळे संपूर्ण निधी परत गेला.

निधी परत जाण्याचे नेमके कारण काय?

कारण शोधून संबंधितांवर कारवाई करावी तसेच मशीन खरेदीसाठी परत निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून रुग्णांची गैरसोय होणार नाही.

अशी विनंती विधानसभा अध्यक्ष यांना आमदार हरीश पिंपळे यांनी सभागृहात केली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!