Join WhatsApp group

विवाहित महिलेचा छळ प्रकरण : आरोपींना सोडण्याचे आदेश

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक ०३ : जय मिश्रा :अकोला : विवाहितेने आपल्या माहेरून 5 लाख रुपये आणले नाही म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप करत पती आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची चौकशी करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपींविरुद्ध ठोस पुराव्याअभावी त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले.
याप्रकरणी विवाहितेने सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ज्यामध्ये तिचा विवाह सुनील नामदेवराव रावळे यांच्याशी झाल्याचे सांगण्यात आले होते. लग्नानंतर सासरचे लोक चांगले वागू लागले मात्र काही काळानंतर आई-वडिलांच्या घरून पैसे आणण्यासाठी त्यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.

ती बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथील ग्रामीण रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. सासरचे महिन्याचा पगार जबरदस्तीने हिसकावून घ्यायचा. यासोबतच आरोपी पतीने बळजबरीने तिच्याशी अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि आरोपी तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ करत होते.

या तक्रारीच्या आधारे सिव्हिल लाईन पोलिसांनी सुनील रावळे, नामदेव रावळे, जानवी रावळे, अनिल रावळे, संध्या रावळे यांच्याविरुद्ध कलम ४९८ अ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनेचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणाची सुनावणी मुख्य दंडाधिकारी शीतल एस. बागंड यांच्या न्यायालयात झाली.

सुनावणी दरम्यान नामदेवराव रावले आणि जान्हवी रावळे यांचा मृत्यू झाला. न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी साक्षीदार व आरोपीच्यावतीने वकील ओंकार खंदारे यांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी संशयाचा फायदा देत आरोपींना सोडून देण्याचे आदेश दिले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!