Join WhatsApp group

मूर्तिजापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणीचा माणिकराव ठाकरे यांचा दौरा आज

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर/ता.२८ : मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती व पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधव अत्यंत अडचणीत सापडले असून, शासनाकडून तात्काळ मदतीची मागणी होत आहे.

या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्याकरिता काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व समिती प्रमुख मा. माणिकरावजी ठाकरे साहेब रविवार, दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात अॅड. महेश गणगणे (समिती सदस्य) तसेच मूर्तिजापूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि स्थानिक काँग्रेस नेते सोबत असतील.

दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

⏰ दुपारी २.३० वाजता : अमरावती येथून मूर्तिजापूर येथे आगमन

⏰ दुपारी ३.०० वाजता : लाखपुरी येथे नुकसानग्रस्त शेतांची पाहणी

⏰ दुपारी ४.०० वाजता : मंगरुळ कांबे येथे शेतांची पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद

⏰ संध्याकाळी ५.०० वाजता : शासकीय विश्रामगृह, मूर्तिजापूर येथे आगमन व पूरग्रस्त परिस्थितीबाबत पत्रकार परिषद

या पाहणीद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन हेक्टरी किमान हजार रुपये तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही माहिती जिल्हा सचिव युवक काँग्रेस नितीन गायकवाड यांनी दिली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!