Join WhatsApp group

अकोट फैल पोलिसांची मोठी कारवाई – ११ जुगारी अटकेत, १ लाखाहून अधिक रक्कम जप्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – अकोट फैल पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार खेळणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत पोलिसांनी ११ जुगारींना रंगेहाथ पकडले आहे. मलिक चौक परिसरात ५२ पत्त्यांवर जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

या छाप्यात पोलिसांनी ९,४०० रुपये रोख, १० मोबाईल फोन (किंमत अंदाजे ९२ हजार रुपये) आणि एकूण १,०१,४०० रुपये किमतीच्या वस्तू जप्त केल्या.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत करण्यात आली.

अकोट फैल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेख रहीम यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे डीबी पथकाने छापा टाकून कारवाई केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

अजीम खान अकील खान, सलीम शाह नजीर शाह, जुबेर खान मंजूर खान, सय्यद फैजान सय्यद बकर, नियामत खान सुलतान खान, शेख कलीम शेख कय्युम, रियान अहमद झिया अहमद, कलीम शाह मौला शाह, शेख शरीफ शेख शमशेर, मकसूद खान मंजूर खान, अब्दुल आमर अब्दुल हमीद.

सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस निरीक्षक शेख रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी अनिश पठाण, योगेश काटकर, इम्रान शाह, गिरीश तिडके, आमिर आणि हर्ष श्रीवास यांनी केली.

जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांचा धडक मोर्चा सुरु असून, भविष्यात आणखी कडक कारवाया करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिस प्रशासनाने दिले आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!