Join WhatsApp group

एम. बी. कराटेच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश

Photo of author

By Sarkarmzanews

Share

नाशिक : नुकतीच पार पडलेली शोतोकान कराटे स्पर्धा चंचल कराटे स्पोर्ट, नाशिक यांच्या वतीने दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी स्ट्रॉबेरी स्कूल, कडवे नगर, पाथर्डी फाटा, नाशिक येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये अकोला जिल्ह्यातील एम. बी. कराटेच्या २३ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

या खेळाडूंनी काता व कुमिते या गटांमध्ये विविध वय व वजनगटांत प्रभावी कामगिरी करत २३ पैकी तब्बल १८ सुवर्ण पदके तर ५ रौप्य पदके पटकावून अकोल्याचा नावलौकिक वाढविला.

या खेळाडूंनी काता व कुमिते या गटांमध्ये विविध वय व वजनगटांत प्रभावी कामगिरी करत २३ पैकी तब्बल १८ सुवर्ण पदके तर ५ रौप्य पदके पटकावून अकोल्याचा नावलौकिक वाढविला.

मुर्तीजापूर तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात लौकिक मिळवलेल्या एम. बी. कराटे संघाचे अध्यक्ष सेन्साई गंगाधर जाधव तसेच गजानन महाराज संस्थेचे उपाध्यक्ष संतोष भांडे व प्रशिक्षक समीर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा पार पडली.

🏅 सुवर्णपदक विजेते :अद्विक शर्मा, स्थवन कुंभारे, साई भोरे, मंथन शेंडे, सक्षम कडू, अबिर बोर्ड, अंशुमन सरोदे, आर्यन शेलोरकर, रुद्र फुके, संमेक भोंगळे, अक्षरा ठाकरे, आराध्या कांडलकर, मनस्वी कावरे, आर्या मानकर, देवांश भांडे, सोहम तांडेराव, स्वरांजली वरवटकर.

🥈 रौप्यपदक विजेते :विराज भारसाकडे, रियांश तांबडे, पुनम पोळेकर, शाहरुख शहा, शाम तालम.

मुर्तीजापूर येथे आगमन झाल्यानंतर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रल्हाद शेलोरकर, प्रवीणराव मानकर, पुरुषोत्तम कडू, शिपाल कावरे व प्रशांत शेंडे यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!