Join WhatsApp group

मुर्तीजापूर न्यायालय आवारात वकिलास शिविगाळ व धमकी; दिव्यांग वकिलाचा अपमान, गुन्हा दाखल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर (प्रतिनिधी) – प्रथमवर्ग न्यायालय, मुर्तीजापूर येथे घडलेल्या प्रकाराने कायदे व्यवसायात खळबळ उडाली आहे. ४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साधारण १.४५ वाजता, वकिल ॲड. तिलक कौशलेंद्र सोमानी (वय २९, रा. माना, ता. मुर्तीजापूर, जि. अकोला) यांना न्यायालयाच्या आवारात अश्लील शिवीगाळ, धमकी आणि दिव्यांग असल्याचा अपमान केल्याप्रकरणी रवि उर्फ रविंद्र दयाराम कोकणे (वय ३२, रा. माना) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारीनुसार, आरोपी कोकणे यांनी सन २०२४ मध्ये संजय वाघमारे यांच्याविरुद्ध माना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.

त्या प्रकरणात ॲड. सोमानी यांनी वकिलपत्र घेतल्याने आरोपीला चीड आली. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी न्यायालय परिसरात आरोपीने वकिलांना शिविगाळ करत धमकी दिली.

एवढेच नव्हे तर, ते दिव्यांग असल्याची जाणीव असतानाही त्यांच्याबाबत अपमानास्पद शब्द वापरले.या घटनेबाबत मुर्तीजापूर शहर पोलीस ठाण्यात अप क्र. ३८८/२५ अंतर्गत कलम २९६, ३५१(२) भारतीय न्याय संहिता व कलम ९२, दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा २०१६ अन्वये कायमी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!