Join WhatsApp group

अकोला राज्य परिवहन महामंडळामार्फत (एसटी) १३१० बस गाड्या खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता : सावरकर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक 04: अकोला: सामाजिक, प्रशासकीय स्तरावर तसेच विधिमंडळाचा पुरेपूर वापर करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असणारे शेतकऱ्यांचे नेते आमदार रणधीर सावरकर यांनी एसटी महामंडळातील एसटी खरेदी प्रकरणात झालेला गैर, अनिमित्त प्रकरणी प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून सर्वसामान्य लक्ष वेधले.

सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.सदरील विषयावर तारांकित प्रश्न क्रमांक२३ नुसार शासनास विचारणा केली असता राज्य परिवहन महामंडळामार्फत (एसटी) १३१० बस गाड्या खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून, यात सुमारे २ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय, तसेच सदर गाड्या खरेदीच्या मूळ प्रस्तावात शासनाच्या मान्यतेनंतर परिवहन विभागाने ठेकेदारांच्या हितासाठी निविदेतील अटी व शर्तीमध्ये परस्पर बदल केला होता.

असा तारांकित प्रश्न क्रमांक २४ नुसार उपस्थित करून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सदर निर्णयास . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी, २०२५ मध्ये स्थगिती दिलेली असून त्याप्रकरणी परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत चौकशीचे आदेश आहेत,

याची सत्यता काय असा प्रश्न उपस्थित केला होता, सदरील प्रश्नाच्या उत्तरात राज्य परीवहन विभागाचे मंत्री . प्रताप सरनाईक यांनी राज्य परिवहन महामंडळामार्फत १३१० बस गाड्यांच्या खरेदी प्रकियेत अनियमिता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने चौकशी करुन सदरची प्रक्रीया रद्द करण्यात आली आहे असे स्पष्ट केले, व एसटी महामंडळाने प्रवाशांना चांगला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सावरकर यांनी केली


Share

Leave a Comment

error: Content is protected !!