Join WhatsApp group

लेडी सिंघम श्रीमती वैशाली मुळे यांची मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस पदी नियुक्ती

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (प्रेमराज शर्मा) – आपल्या धाडसी कारवाई व कर्तव्यनिष्ठेने राज्यभरात “लेडी सिंघम” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती वैशाली मुळे यांची मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस पदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्या एमआयडीसी अकोला पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पदावर कार्यरत होत्या.अनेक वर्षांचा दांडगा अनुभव, गुन्हेगारीवर कठोर कारवाई व गुन्ह्यांच्या सखोल तपासाची खास शैली यामुळे त्यांनी आजवर असंख्य गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे.

अकोला शहरात त्या “गुन्हेगारांचा कर्दनकाळ” म्हणून परिचित असून त्यांच्या कार्यकाळात एमआयडीसी परिसरातील अनेक कुख्यात गावगुंडांना कायद्याच्या कचाट्यात ओढण्यात आले.विशेष म्हणजे, श्रीमती मुळे यांनी केवळ गुन्हेगारांवरच नव्हे, तर पोलीस दलातही शिस्तीची कडक अंमलबजावणी केली आहे.

कामात हलगर्जी, नियमभंग किंवा जनतेशी गैरवर्तन सहन न करण्याची त्यांची कार्यपद्धती असून, त्यामुळे अधिनस्त पोलीस अधिकारी व कर्मचारी नेहमी सतर्क राहतात.

व्यापाऱ्यांना सुरक्षित वातावरण देणे, गुन्हेगारीवर आळा बसवणे व वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

त्यांच्या नियुक्तीमुळे मूर्तिजापूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेला नवी दिशा मिळेल आणि पोलीस दलात अधिक शिस्त व जबाबदारीची जाणीव निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!