Join WhatsApp group

कुरणखेड टोलनाक्यावर विशेष व्यक्तींचा वाहनांना सूट.

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : दिनांक २३ ऑक्टोबर २५ :

कुरणखेड टोल प्लाझा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कारण, काही प्रभावशाली व्यक्ती, स्थानिक राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांना टोलमधून सूट दिली जात असल्याचे समोर आले आहे.

सर्वसामान्य नागरिकांना प्रत्येकवेळी टोल भरावा लागत असताना, काहींच्या गाड्या मात्र टोलशिवायच जात असल्याने “हा टोल नाका की भ्रष्टाचार नाका?” असा प्रश्न जनतेमध्ये उपस्थित होत आहे.

या अनियमिततेचा मागोवा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी स्थानिक पत्रकारांनी टोल प्लाझावर भेट देऊन रिपोर्टिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना दमदाटी करत रोखले. “तुम्ही इथे शूटिंग आणि रिपोर्टिंग करू शकत नाही, ही NHAI ची प्रॉपर्टी आहे,” असे सांगत व्यवस्थापकाने पत्रकारांना थांबवले.

माध्यमांना अशा पद्धतीने रोखणे हे लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर गदा आणणारे असल्याची तीव्र प्रतिक्रिया स्थानिक पत्रकार संघटनांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे टोल प्लाझा व्यवस्थापनाच्या कारभारावर आणि पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!