Join Whatsapp

दिवाळी किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा : अकोट दिनांक २ : किल्ले रायगडाचा स्लाईड शो सह किल्ले बांधणी स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न, स्थानिक श्री नरसिंग विद्यालय आकोट व इतिहास प्रबोधन संस्था महाराष्ट्र जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी किल्ले बांधणी स्पर्धा २०२४ चे आयोजन दिनांक १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. १ डिसेंबर ला श्री नरसिंग विद्यालयात संपन्न झाला.

बक्षिस वितरण समारंभाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश जोशी तसचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री रविंद्र पाटील इतिहास तज्ञ, सौ भारती साठे, सचिव इतिहास प्रबोधन संस्था, आकोट चे गाडे इतिहास अभ्यासक श्री अशोक टेमझरे, मुख्य परीक्षक श्री राजेश अढाऊ तसेच पर्यवेक्षक श्री मिलींद देवळे यांची विशेषत्वाने उपस्थिती होते.

कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते श्री नरसिंग महाराज व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी सर्वांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. सौ भारती साठे यांनी रायगडाच्या बद्दल ची बारीक सारीक माहिती स्लाईड शो द्वारे करुन दिली.

रायगडचा भुगोल, इतिहास तसेच तिथल्या महत्वाच्या स्थानांची महिती विद्यार्थ्यांना करून दिली. अशा प्रकारचा किल्ल्याची सचित्र माहिती देणारा अनोखा स्लाईड शो पहिल्यांदाच मुलांनी बघीतला.दिवाळी किल्ले बांधणी स्पर्धा २०२४ या स्पर्धेत अकोला व अमरावती जिल्ह्यातील एकूण २६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेच्या बक्षिस वितरणात सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र तसेच महाराजांची राजमुद्रा सन्मानचिन्ह म्हणून देण्यात आली. स्पर्धेत जळगांव नहाटे गावच्या प्रज्वल नहाटे व गट यांच्या छत्रपती सेवा मंडळ या गटाचा प्रथम क्रमांक आला. दुसरा क्रमांक हर्षवर्धन देशमुख व गट यांच्या जय भवानी मंडळ, घोडगाव (अचलपूर) यांनी पटकावला तर तिसरा क्रमांक ललित मेतकर यांना मिळाला.

विजेत्यांना अनुक्रमे १००१,७०१ व ५०१ अशी रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी मान्यवरांचे हस्ते देण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन श्री गोपाल राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री राजकुमार मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी श्री स्वप्निल शिराळकर, श्री निलेश हेलगे, श्री किशोर चिंचोळे, श्री मुकुल देशपांडे यांनी मेहनत घेतली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!