Join Whatsapp

वरकुटे मलवडी येथे जुगार अड्ड्यावर छापा सहा जणावर गुन्हा दाखल

Photo of author

By Sir

Share

जिल्हा प्रतिनिधी नवनाथ भिसे – माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील श्री खंडोबा मंदिराजवळ सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांनी कारवाई करत छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत ५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वरकुटे मलवडी येथील श्री खंडोबा मंदिराजवळ. राजाराम धोंडीराम आटपाडकर वय59 वर्ष , अनिल खाशाबा चव्हाण वय 39 वर्ष, मोहन साहेबराव बनसोडे वय तीस वर्ष, भीमा श्रीपती बनसोडे वय50 वर्ष, युवराज गुलाब बुधावले वय 39 वर्ष, महादेव देवबा जगताप वय 65 वर्ष, पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळत असल्याची माहिती म्हसवड पोलिसांना मिळाली.

दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४. ३० वाजण्याचे सुमारास खंडोबा मंदिराचे आडोशाला बेकायदा बिगरपरवाना कँटमधील पत्यांच्या पानावर पैसे लावुन जुगार खेळत असताना आढळून आले. काही जण गोल रिंग करुन बसून मध्यभागी पत्ते व पैसे टाकून जुगार खेळत असल्याचे दिसले.

दरम्यान पोलिसांनी त्यांना पकडत त्यांच्या जवळील जुगाराचे साहित्य, तसेच रोख रक्कम व आदी साहित्य जप्त केले. जुगाराच्या साहित्यासह ५०२० रुपयाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. सरकार तर्फे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे पोलिस हवालदार नवनाथ शिरकुळे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात कायदेशीर फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस रुपाली फडतरे करत आहेत


Share

Leave a Comment

error: Content is protected !!