Join WhatsApp group

Ads

सत्य लिहिलं म्हणून मारहाण; ५० हजारांची खंडणी, पत्रकाराला उघडी धमकी

By Sarkar Maza

February 28, 2026 7:31 am

Ads

प्रतिनिधी | अकोला : दिनांक २८ :

अकोला शहरात पत्रकारितेवर थेट हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीने दोन साथीदारांसह पत्रकाराला अडवून मारहाण करत ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरातील पत्रकार वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तक्रारीनुसार, महानगरपालिका परिसरात संबंधित पत्रकाराला प्रथम धमकी देण्यात आली. “बातमी बंद कर, नाहीतर परिणाम भोगावे लागतील” असा इशारा देत त्याच्यावर दबाव आणण्यात आला. त्यानंतर वसंत टॉकीजजवळ मोटारसायकल अडवून तिघांनी अश्लील शिवीगाळ केली. अचानक गालावर चापट मारत खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. एवढ्यावरच न थांबता “५० हजार रुपये दे, नाहीतर दोन दिवसांत संपवू” अशी उघड जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पत्रकार सुरक्षित आहेत का?

सत्य बाहेर आणणाऱ्या पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येईल, अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. पत्रकार संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे.

खंडणीसाठी हल्ला; शहरात संताप

पत्रकाराला गप्प बसवण्यासाठी मारहाण आणि पैशांची मागणी करण्यात आल्याने ही केवळ गुन्हेगारी घटना नसून लोकशाहीवरील उघड हल्ला असल्याची भावना व्यक्त होत आहे. या घटनेनंतर पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पीडित पत्रकाराची प्रतिक्रिया

“मी माझं कर्तव्य म्हणून बातमी प्रसिद्ध केली. कोणाच्याही दबावाखाली न येता सत्य मांडणं हीच पत्रकारितेची शपथ आहे. मात्र बातमीचा राग मनात धरून माझ्यावर अशा पद्धतीने हल्ला होईल, अशी कल्पनाही केली नव्हती. मला अडवून अश्लील शिवीगाळ करण्यात आली, मारहाण करण्यात आली आणि थेट पैशांची खंडणी मागण्यात आली. ‘बातमी बंद कर नाहीतर संपवू’ ही दिलेली धमकी ही केवळ माझ्यावर नाही तर संपूर्ण पत्रकारितेवरचा हल्ला आहे.

या घटनेमुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी तातडीने आणि कठोर कारवाई करून आरोपींना अटक करावी, तसेच मला संरक्षण द्यावे, ही माझी मागणी आहे. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. सत्य मांडण्याचे काम पुढेही सुरूच ठेवणार आहे.”

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!