Join WhatsApp group

मूर्तिजापूर येथे खासदार अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीत जनऔषधी दिवस साजरा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक 07 : मुर्तिजापूर: जनऔषधी दिवस हा 7 मार्च रोजी साजरा केला जातो. जनऔषधीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 1 मार्च ते 7 मार्च हा संपूर्ण आठवडा ‘जनऔषधी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

जनऔषधी योजना ही भारत सरकारची एक मोहीम आणि लोककल्याणकारी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2008 मध्ये रसायने आणि खते मंत्रालयाने केली होती.

2016 मध्ये या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि जनतेला परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाला बळ देण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP) म्हणून पुनर्ब्रँड करण्यात आले. या योजनेद्वारे जनऔषधी केंद्रे (जेएके) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समर्पित दुकानांद्वारे सर्वांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून दिली जातात.

या निमित्ताने आज अग्रसेन चौक मुर्तिजापूर येथे अकोला लोकसभेचे खासदार अनुप धोत्रे आज यांनी उपस्थिती लावली असून जन औषधी बद्दल आढावा घेतला तसेच जन औषधी बद्दल जनतेला जागरूक करून केंद्र शासनाचा उपक्रमा बद्दल माहिती दिली.

जन औषधी केंद्राचा समस्या जाणून घेतल्या. जन औषधी केंद्र संचालक मनोज काशवानी व मुकेश काशवानी यांनी शाळ व श्रीफळ देऊन खासदार अनुप धोत्रे यांचे स्वागत केले. तसेच शिवम पाटील (जन औषधी महाराष्ट्र नोडल अधिकारी) आभार प्रदर्शन करत जन औषधी बद्दल जनतेला जागरूक केले.

कार्यक्रमाचा वेळेस भूषण कोकाटे, रितेश साबाजकर, सतीश शर्मा, पप्पू मुळे, सचिन खरतरकर, निलेश वानखडे, राहुल पाटील, विनोद गुंजाळ, संभाजी देशमुख, राम कांबे व इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!