Join WhatsApp group

अकोला शहरात नाही राहिला कायद्याचा धाक? गुंडांचा दहशतवाद सीसीटीव्हीत कैद

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना मंगळवारी पहाटे घडली. रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळीपुरा येथील आझाद चौकात अज्ञात गुंडांनी दोन ऑटो रिक्षांची तोडफोड करत दहशत निर्माण केली.

विशेष म्हणजे ही धक्कादायक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, आरोपी अद्याप मोकाट आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रेवन गायकवाड आणि नरेंद्र बाळाभाऊ रणपिसे यांच्या ऑटो रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. गुंडांनी रिक्षांच्या काचा फोडून परिसरात गोंधळ घातला आणि पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अज्ञात तरुण हे कृत्य करताना स्पष्टपणे दिसून येतात.

या घटनेमुळे माळीपुरा परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, रात्रीच्या वेळेस सुरक्षिततेबाबत त्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. या संदर्भात रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या असामाजिक घटकांच्या उपद्रवामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावी, अशी मागणी जोर धरत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!