Join WhatsApp group

मूर्तिजापूर शासकीय कार्यालयातील आपत्कालीन विभागाची नौका कचऱ्यामध्ये सडत पडली?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (दिनांक २३ जुलै २५):आपत्कालीन आपत्ती व्यवस्थापनासाठी शासनाकडून पुरवण्यात आलेली महत्त्वाची साधने वापराअभावी धूळखात पडली आहेत, याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे मूर्तिजापूर शासकीय कार्यालयातील आपत्कालीन विभागाची नौका.

ही नौका सध्या कार्यालयाच्या मागील बाजूस कचऱ्यामध्ये सडत असून तिची कोणतीही देखभाल केली जात नाही. पुर, जलप्रलय, बचाव कार्य अशा आपत्कालीन परिस्थितींसाठी अत्यावश्यक ठरणारी ही साधने वेळच्या वेळी तपासून ती योग्य स्थितीत ठेवण्याची जबाबदारी प्रशासनावर असते.

oplus_8388608

मात्र, या नौकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून ती वापरण्यायोग्य राहिली नाही, असे चित्र सध्या दिसत आहे.स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, लाखो रुपयांचा निधी खर्च करून विकत घेतलेली साधने जर अशी निष्काळजीपणामुळे नष्ट होत असतील, तर प्रशासनाची जबाबदारी काय?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

प्रशासनाने नौकेची तात्काळ देखभाल करून तिचे सान्निध्य ठेवावे–

आपत्कालीन साधनांचा वारंवार तपास करावा–

जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी –

ही नौका जर वेळेवर वापरण्यायोग्य स्थितीत नसेल, तर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!