Join WhatsApp group

आयपीएस अधिकाऱ्यावर सब इंस्पेक्टरच्या पत्नीच्या लैंगिक शोषणाचा आरोप; पोलीस दलात खळबळ

Photo of author

By Sarkarmzanews

Share

रायपूर (छत्तीसगड) – राज्यातील राष्ट्रपती पदक विजेते वरिष्ठ आयपीएस अधिकारी रतनलाल डांगी यांच्यावर धक्कादायक आरोप झाले आहेत. त्याच पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका सब इंस्पेक्टरच्या पत्नीने लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करत पोलिस मुख्यालयात डीजीपींकडे लिखित तक्रार दाखल केली आहे. या घटनेने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सब इंस्पेक्टरच्या पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, डांगी यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील कृत्यं केली आणि मानसिक छळ केला. “मी वॉशरुमला जायचे किंवा आंघोळीला देखील तेव्हा सुद्धा व्हिडिओ कॉल सुरू असायचा,” असा धक्कादायक खुलासा संबंधित महिलेनं केला आहे.

या प्रकरणाची चौकशीची जबाबदारी २०११ बॅचचे आयपीएस अधिकारी आनंद छाबडा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “आयपीएस असो वा आयएएस, आरोप झाल्यास चौकशी तर होणारच. आरोप सिद्ध झाले तर कारवाईही होणार.

दरम्यान, रतनलाल डांगी यांनी स्वतः डीजीपींना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळत महिला स्वतः ब्लॅकमेल करत असल्याचा दावा केला आहे. “ती सतत आत्महत्येची धमकी देत होती, विषाची बाटली घेऊन माझ्या ऑफिसमध्ये आली होती. माझ्या पत्नीशी संबंध ठेवू नका असा दबाव आणत होती,” असं डांगी यांनी म्हटलं आहे.

डांगी यांनी पुढे सांगितलं, “ती मला रात्री १० नंतर बाल्कनीत झोपायला लावायची, लाइव्ह लोकेशन व व्हिडिओ कॉल पाठवायला भाग पाडायची. सकाळी पाचपर्यंत कॉल चालायचा. विरोध केला की ती व्हिडिओ व चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी द्यायची.”

रतनलाल डांगी हे २००३ बॅचचे छत्तीसगड कॅडर आयपीएस अधिकारी असून, त्यांनी सरगुजा, दुर्ग, बिलासपूर आणि रायपूर येथे आयजी म्हणून काम पाहिलं आहे. ते छत्तीसगडमध्ये दोन राष्ट्रपती पदके मिळवणारे पहिले आयपीएस अधिकारी आहेत.

या प्रकरणातील आरोप आणि प्रत्यारोपांमुळे छत्तीसगड पोलीस दलात खळबळ उडाली असून, सत्यता चौकशीनंतरच समोर येणार आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!