Join WhatsApp group

अकॅडमिक हाइट्स पब्लिक स्कूल, मुर्तीजापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर : २२ जून २५ – अकॅडमिक हाइट्स पब्लिक स्कूल, मुर्तीजापूर येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरा करण्यात आला. या खास दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सकाळीच एकत्र येऊन योगाभ्यास केला. संपूर्ण वातावरण योगमय झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर योग प्रशिक्षक सचिन वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, अनुलोम-विलोम यासारखी योगासने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सादर केली. लहान मुलांपासून ते मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला.

योग दिनाचे महत्त्व समजावून सांगणारे भाषण शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री सौरभ कुमार सर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना दररोज योग करण्याचे महत्त्व पटवून दिले. योगामुळे मनःशांती, एकाग्रता आणि शरीराची तंदुरुस्ती टिकून राहते, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या योगासने पाहून उपस्थित पालक आणि शिक्षकवृंद भारावून गेले. काही विद्यार्थ्यांनी योगदिनाच्या अनुषंगाने कविता आणि घोषवाक्यांचे सादरीकरण देखील केले.

कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा शिक्षक श्री. सागरसिंह कनकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायक वातावरणात पार पडला. शाळेचे प्राचार्य श्री खुशाल थानवी सर या योगाभ्यासाला वेळातला वेळ काढून उपस्थित राहिले.


अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक व मानसिक संतुलन निर्माण होऊन त्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते, असे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!