Join WhatsApp group

पुनर्वसन साठी बेमुदत उपोषण

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर : तालुक्यातील माना येथील काही अतिक्रमणधारकांची घरे ग्रामपंचायतने ५-६ महिन्यांपूर्वी काढली होती. अतिक्रमण हटविल्यानंतर अनेक नागरिक बेघर झाल्याने त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न समोर आला आहे. यासाठी माना येथील बेघर ग्रामस्थांनी एल्गार पुकारीत १३ जानेवारीपासून येथील उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

माना ग्रामपंचायतकडून कोर्टाच्या आदेशाने माना टोथील जुना प्लॉट येथे शासकीय जागेत अतिक्रमण करुन राहत असलेल्या ग्रामस्थांचे अतिक्रमणातील घरे ५-६ महिन्यांपूर्वी हटविण्यात आली. ही घरे हटविल्याने ५० ते ६० कुटुंब बेघर झाल्याने त्यांना माना फाट्याजवळ असलेल्या ई-क्लास जागेवर अथवा इतर कुठेही पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली आहे. या निवेदनावर जवळपास २० जणांच्या स्वाक्षरी आहेत.

तसेच पुनर्वसनाच्या मागणीसाठी सोमवारपासून संजय रामकृष्ण अवजारे, वीरसिंग शिवसिंग राठोड, महिंद्र बाळू सावळे यांनी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यावर प्रशासन काय तोडगा काढते, याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!