Join WhatsApp group

अकोला रेल्वे स्थानकावरील वाढती गुन्हेगारी; नियंत्रणासाठी सक्षम अधिकाऱ्यांची गरज

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : २ जुलै २५: अकोला रेल्वे स्थानक हे विदर्भातील प्रमुख स्थानकांपैकी एक असून, दररोज येथे शेकडो प्रवासी विविध गाड्यांमधून प्रवास करतात.

परंतु अलीकडच्या काळात या स्थानकावर गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी जरी जीआरपी (Government Railway Police) आणि आरपीएफ (Railway Protection Force) यांच्यावर असली, तरी प्रत्यक्षात चोऱ्या आणि अवांछित हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात अपयश येत असल्याचे दिसून येते.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला रेल्वे स्थानकावर दोन टप्प्यांमध्ये गुन्हेगारी होत आहे. पहिल्या टप्प्यात गुन्हेगार रेकी करतात आणि दुसऱ्या टप्प्यात दुसरे गुन्हेगार प्रत्यक्ष चोरी किंवा अन्य गुन्हा करतात.

त्यामुळे पोलिसांना आरोपींचा माग काढण्यात अडचणी येत आहेत.प्रवाशांनी तक्रार नोंदवताना असे स्पष्ट केले आहे की, चोरी ही बहुतांशी ट्रेन अकोला स्थानक सोडल्यानंतर लक्षात येते. विशेषतः रात्रीच्या वेळेस स्टेशन परिसरात संशयास्पद आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची वर्दळ वाढली आहे.

ही मंडळी स्थानक परिसरात सहज प्रवेश करतात आणि निर्भयपणे गुन्हे करून पसार होतात.रेल्वे सुरक्षा विभागामधील जबाबदार अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, तसेच अपुरी कर्मचारी संख्या हीदेखील या समस्या वाढण्यामागील महत्त्वाची कारणे ठरत आहेत. प्रवाशांच्या मते, जर जीआरपी आणि आरपीएफमध्ये सक्षम अधिकारी आणि पुरेशी मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली, तर गुन्हेगारीला आळा घालणे शक्य आहे.रेल्वे स्थानकावरील सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणेला अधिक सक्षम करण्याची गरज आता अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे.

प्रवाशांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.

📌 अकोला स्थानकात वाढती चोरी व गुन्हेगारी.

रेकी करणारे व चोरी करणारे वेगळे टोळीचे सदस्य.

जीआरपी व आरपीएफचा प्रभाव नाही.रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचालींची वाढ.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सक्षम अधिकाऱ्यांची तातडीने गरज.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!