Join WhatsApp group

जामठी शिवारात पुन्हा झाले शेतकऱ्यांना हिंस्र प्राण्यांचे दर्शन – वनविभागाचे कर्मचारी नॉट रिचेबल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक ०३ : मुर्तीजापुर : मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव जामठी खुर्द गावात शिरुन हिंस्र वन्यप्राण्यांनी एका शेतकऱ्यांच्या गोठ्या शेजारी असलेल्या दोन वासरांचा फडशा पाडला होता. ही घटना ताजी असताना तेव्हापासून हे हिंस्त्र पशू याच शिवारात वावरत असून आतापर्यंत अनेकांना त्यांचे दर्शन झाले. असले तरी वनविभागाला घटनेचे गांभीर्य नसल्याचे लक्षात येते.


३० जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी शेतावर हरभऱ्याची राखणी करायला गेलेल्या काही शेतकऱ्यांना ३१ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास दोन दोन बिबट सदृश्य प्राणी आढळून आले, अंधारात शेतात खाट टाकून झोपले असलेल्या शेतकऱ्यांच्या खाटे पासून काही अंतरावरून हे बिबट सदृश्य वन्यप्राणी दुसर्‍या शेतात गेले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी दिली, काळोख असल्याने ते बिबट होते की, तरस हे स्पष्ट दिसून आले नसले तरी घटनास्थळी त्यांच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत.
सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनविभागाने शोधमोहीम सुरु केली आहे, दरम्यान पाऊलखुणा आढळून आल्या असल्या तरी, शोधमोहीम पथकाला प्राण्यांचे अजूनही दर्शन झाले नाही, पाऊलखुणांवरुन कुठला प्राणी आहे त्याची ओळख पटते मात्र, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी कुठल्या प्राण्यांच्या पाऊलखुणा आहे हे ठामपणे सांगू शकले नाही. ३१ जानेवारी रोजी दहातोंडा येथील काही शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी हे पशू आढळून आले, घाबरू त्यांनी गाव गाठले असल्याची माहिती आहे.

सध्या तुर, हरभरा कापणीचा हंगाम आहे, कापणी करुन शेतात पडून असलेल्या पीकांची राखणी करण्यासाठी शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात झोपायला जातात, परंतु वारंवार हिंस्त्र वन्यजीव दिसून येत असल्याने या परीसरातील शेतकरी भयभीत झाला असल्याने, शेतमालाची राखणी व इतर कामे कशी करायची असा प्रश्ननिर्माण झाला आहे. दरम्यान सबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दिवसभरापासून मोबाईल बंद असल्याचे आढळून आले.
३० तारखेच्या रात्री आम्ही शेतमालाची राखणी करायला चार लोक शेतात गेलो होतो, ३१ तारखेला पहाटे दोन वन्यप्राणी दिसून आले ते बिबट होते की, तरस हे स्पष्ट दिसले नाही, सकाळी त्या दिशेने आम्ही गेलो असता तेथे पाऊलखुणा दिसून आल्या त्या अजूनही जशाच्या तशा आहेत असल्याची माहिती शेतकरी मोहन वाकोडे यांनी दिली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!