Join WhatsApp group

महिला व मुलींसाठी शासनाच्या महत्वाच्या योजना

Photo of author

By Sarkarmzanews

Share

नमस्कार मित्रांनो महिलांसाठी मुलींसाठी शासनाच्या निघालेल्या काही योजना राबविण्यात आल्या आहेत त्या कोणत्या आहेत आणि त्यासाठी अर्ज कसा करावा कागदपत्रे कोणती लागतील आणि त्यांचा महिलांना लाभ काय होईल ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर योजना पुढील प्रमाणे आहेत.

• महिला व मुलींसाठी शासनाच्या महत्वाच्या योजना Mahilasathi Yojana

1.शक्ती गट नोंदणी :

शक्ती गट नोंदणी म्हणजे महिला गटाची जी नोंदणी असते ती या योजनेत महिलांना लाभ काय असतो बघा महिलांना एकत्रित येऊन प्रशिक्षण घेणे, उद्योग उभारणे व त्यातून आर्थिक उन्नती साधने याकरिता शक्ती गट म्हणजेच बचत गट स्थापन केली जातात.बचत गटांमध्ये महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळतो. त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे बघा. सर्व सदस्यांचे आधार कार्ड, एक फोटो अध्यक्ष व सचिव यांची नावे. अर्ज कुठे करावा लागतो तर जवळच्या राष्ट्रीय कृत बॅंक किंवा जिल्हा धर्मादाय कार्यालयात तुम्ही बचत गटासाठी अर्ज करू शकता.

2.प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना :

या योजनेचा लाभ 14 ते 15 वयोगटातील युवती व महिलांना विविध म्हणजेच 332 प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी लाभ मिळतो. 2.प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिलांना 3 वर्षाकरिता 2 लाख रुपयांचा मोफत अपघाती विमा भेटते. 3. या योजनेमध्ये प्रशिक्षण घेणार्या महिलांना जॅकेट, डायरी पेन व ओळख पत्र मोफत दिले जाते.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे • आधार कार्ड • एक फोटो• शाळेचा दाखला• मोबाईल क्रमांक. हा अर्ज जिल्हा विकास कौशल्य अधिकारी किंवा www.pmkvyofficial.org. या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. Mahilasathi Yojana

3.चर्मकार समाजातील महिलांना प्रशिक्षण योजना :

योजनेचा लाभ1. शिवणकला 2. ब्युटी पार्लर 3. इलेक्ट्रिक वायरमन. 4 टर्नर फोटो. 5 मशीनवर स्वेटर विकणे. 6. खेळणी बनविने टि. व्ही रेडिओ टेपरेकॉर्ड मेकॅनिक. संगणक प्रशिक्षण मोटर वाईंडींग फॅब्रिकेटर वेल्डिंग अटोमोबाईल रीपेरींग, वाहनचालक, चर्मोद्योग पादत्रान उत्पादन, चर्मोद्योग चर्मवस्तु उद्योग चर्मवस्तु उत्पादन, यांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते.
मोफत प्रशिक्षण व्यतिरिक्त प्रशिक्षणार्थीस दरमहा रुपये 150 ते 300 पर्यंत विद्यावेतन देण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
    •एक फोटो
    •शाळेचा दाखला
  • मोबाईल क्रमांक.
    यासाठी अर्ज कुठे करावा लागतो.
    जिल्हा कार्यालय संत रोहिदास चर्मोउद्योग आणि चर्मकार महाविकास मंडळामध्ये.

4.व्यवसायीक प्रशिक्षणासाठी मुलींना विद्यावेतन योजना :

या योजनेचा लाभ.शासन मान्य संस्थेत नर्सिंग, पॅलिंग, टेलीफोन आपरेटर, टंकलेखन, संगणक आयटी आय इ. प्रशिक्षण घेणार्या आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील महिला व मुलींना प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये दरमहा 100 रुपये विद्यावेतन देण्यात येते. आवश्यक कागपञे पुढील प्रमाणे आहेत.

  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शिदापत्रीकेचा छायाप्रत
  • प्रशिक्षण संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
    अर्ज कुठे करावा.
    • जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मंडळामध्ये अर्ज करू शकता.

Mahilasathi Yojana महिला व मुलींसाठी काही विशेष योजना

5.वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना :

योजनेचा लाभ या योजने अंतर्गत योजदारास 10 लाखापर्यंत गुंतवणूकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.यामध्ये राष्ट्रीय कृत बॅंकेचा सहभाग 60% असुन अर्जदारास 5% रक्कम स्वतः चा सहभाग म्हणून भरावयाची आहे.राष्ट्रीय कृत बॅंकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रकमेच्या 35% रकमेवर दसादशे 4% व्याज आकारण्यात येते.बिज भांडवल कर्ज योजनेच्या परतफेडीचा कालावधी 5 वर्षाचा असून बॅंकेने कर्ज वितरित केल्यानंतर त्वरित दुसऱ्या महिन्यापासून महामंडळाच्या बिज भांडवलाची वसुली सुरू केली जाते. बिज भांडवल वसूली हप्त्याचे आगावू धनादेश घेतले जातात.
आवश्यक कागदपत्रे – ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारास महत्त्वाचे चार दस्तावेज अपलोड करणे अनिवार्य असेल.1.आधार कार्ड2. रहिवासी पुरावा 3. उत्पन्नाचा पुरावा 4. जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला. अर्ज कुठे करावा. जिल्हा कार्यालय अण्णासाहेब पाटील महामंडळ येथे.

6. 25,000 रुपये थेट कर्ज योजना :

या योजने अंतर्गत छोट्या व्यवसायाकरिता 25,000 रुपये महामंडळाकडून कर्ज दिला जातो. आवश्यक कागदपत्रे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावाअर्जदार हा 18 ते 45 वर्षाचा असावा. जातीचा दाखलाउत्पन्नाचा दाखलारेशनकार्डतांत्रिक शिक्षण, प्रशिक्षण घेतल्यास प्राधान्य देण्यात आलेले प्रमाणपत्र उअर्ज कुठे करावा. जिल्हा स्तरित वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जमाती आर्थिक विकास महामंडळात. Mahilasathi Yojana

7. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रम :

या योजनेचा लाभसर्वसाधारण प्रवर्गाकरीता सेवा उद्योगासाठी 15% अनुदान व उत्पादन उद्योगासाठी 25% अनुदान अनुसूचित जाती जमाती महिला दिव्यांग माजी सैनिक करिता सेवा उद्योगासाठी 25% व उत्पादन उद्योगासाठी 35% अनुदान देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे. फोटो, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, •स्वतः चे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, •शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र •कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रे•दिव्यांग असल्याने दिव्यांगाचा दाखला•बॅंक पास बुक•विहीत नमुन्यातील अर्जअर्ज कुठे करावा लागतो. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम वेबसाइटवर किंवा जिल्हा उद्योग केंद्र खाली ग्रामोद्योग यांच्या पोर्टलवर.

8.प्रधानमंत्री स्वनियमन योजना :

या योजनेचा लाभ 10,0000 रुपयापर्यंत कर्ज भेटतो आणि महानगरपालिका नगरपरिषद यामध्ये 4.8% व्याजदराने भेटतो. लागणारी कागदपत्रे. अर्जदाराचा फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बॅंक पासबुक झेरॉक्स, व्यवसाय प्रमाणपत्र, काम करतेवेळी फोटो. अर्ज कुठे भरावा लागतो. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कार्यालय येथे अर्ज भरला जातो.

9.प्रधानमंत्री मुद्रा योजना :

या योजनेचा लाभ- 10,000 रुपयापर्यंत कर्ज भेटतो. लागणारी कागदपत्रे. अर्जदाराचा फोटो, पॅन कार्ड आधार कार्ड, बॅंक पासबुक झेरॉक्स, व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र, मागील दोन वर्षाचा आयकर परतावा, मागील सहा महिन्याचे बॅंक स्टेटमेंट, प्रकल्प अहवाल इत्यादी. अर्ज कुठे करावा. आपले बॅंक खाते असण्यार्या किंवा नजीकच्या बॅंकेत . Mahilasathi Yojana

10. महिला किसान योजना :

या योजनेचा लाभ. शेतजमिनीच्या नावे कर्ज मंजूर करुन घेणार्या महिला लाभार्थीस 50,000 पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये 10,000 रुपये अनुदान व उर्वरित रक्कम 40,000 रुपये कर्ज स्वरूपात वार्षिक 5% व्याज दराने मंजूर करुन देण्यात येते. कर्ज हे फक्त शेतीसाठी देण्यात येते. लागणारी आवश्यक कागदपत्रे. विहीत नमुन्यातील अर्ज, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, प्रशिक्षण प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, कच्चा मालाची दरपत्रके,व्यवसायाच्या जागेसंबंधीची कागदपत्रे, व्यवसायाशी निगडित परवानगी, दोन जमीनदारांची संमतीपत्र , अर्जदाराची दोन छायाचित्रे. अर्ज कुठे करावा. आवश्यक कागदपत्रांसह महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांच्या कार्यालयाकडे संपर्क करावा.

11.बचतगटांसाठी व्याज सवलत योजना :

या योजनेचा लाभ महिला बचत गटांना त्यांनी घेतलेल्या कर्जात सुमारे 7% ची सवलत दिली जाते. त्यामुळे महिला बचत गटांना केवळ 4% इतक्या अल्पदराने कर्ज मिळते. लागणारी कागदपत्रे. विहीत नमुन्यातील अर्ज, बचत गटांच्या सदस्यांची यादी,कर्जाशी संबंधित सर्व कागदपत्रे, कर्ज मुदतीत परतफेड केल्याचा दाखला, एकही हप्ता थकविला नसल्याचे प्रमाणपत्र. अर्ज कुठे करावा. महिला विकास आर्थिक महामंडळाच्या जिल्हा शाखेकडे अर्ज करावा. किंवा वेबसाइटवेबसाइट- www.mavimindia.org.

12.बचत गटासाठी खेळते भांडवल कर्ज योजना :

या योजनेचा लाभ. महिला बचत गटांना बचतीच्या किमान एक पट व कमाल चार पट रक्कम एवढे कर्ज मिळु शकते. दारिद्र्य रेषेखालील बचत गटांना अनुदान दिले जाते. लागणारी कागदपत्रे- विहीत नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज, बॅंक जोडणी झाल्याचा सक्षम पुरावा, बॅंक च्या पासबुक ची झेरॉक्स , बचत गटांच्या महिलांची यादी. अर्ज कुठे करावा. नजिकच्या राष्ट्रीयकृत बॅंकेत. Mahilasathi Yojana

13.बचत गटांना मुदत कर्ज योजना :

या योजनेचा लाभ. विविध बॅंकामार्फत जास्तीत जास्त 5 लाख रुपयापर्यंतचे मुदत कर्ज मंजूर केले जाते. दारिद्र्य रेषेखालील बचत गटांना अनुदान दिले जाते. आवश्यक कागदपत्रे. विहीत नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज, कर्जाच्या आर्थिक उलाढाली चे ताळेबंद पत्र , पहिले श्रेणिकरण झाल्याचे प्रमाणपत्र, बॅंक पासबुकची झेरॉक्स. अर्ज कुठे करावा. नजिकच्या राष्ट्रीयकृत बॅंकेत.

14.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान :

या योजनेचा लाभ कुटुंबाचे दारिद्र्य दूर करून सन्मानाचे जीवन जगण्याच्या उद्देशाने एकाच गावामध्ये किंवा परिसरात राहणार्या महिलाकडुन स्वयंसहायता गटाची स्थापना करणे आणि लघु उद्योग उभारण्यासाठी प्रशिक्षण व अल्पदरात 20 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज दिला जातो. यासोबतच महिला बचत गटांनी उत्पादित केलेले उत्पादन विक्रीसाठी ऑफलाईन व ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. आवश्यक कागदपत्रे. स्वयंसहायता गट नोंदणी, अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड, बॅंक पासबुकची प्रत. अर्ज कुठे करावाउमेद संस्था महिला व बाल विकास विभाग , जिल्हा परिषद पंचायत समिती येथे.

15. बेरोजगार युवती व महिलांची नोंदणी करणे :

या योजनेचा लाभ. बेरोजगार उमेदवारांना राज्यात उपलब्ध रोजगाराची माहिती देणे. रोजगार मेळावे. आवश्यक कागदपत्रे. फोटो, आधार कार्ड, वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, स्वतः चे महाराष्ट्राचे अभिमान प्रमाणपत्र. दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला. अर्ज कुठे करावा. महास्वयंम प्रणालीवरप्रणालीवर किंवा रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी.

16. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना :

योजनेचा लाभ. 18 ते 40 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे मासिक उत्पन्न 15, 000 रुपये असल्यास त्या कामगारांनी नोदणी केल्यावर त्यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यावर 3 हजार रुपये महिन्याला भेटतात. आवश्यक कागदपत्रे. फोटो, आधार कार्ड, वयाचा दाखला, मोबाईल नंबर, बचत बॅंक खाते पासबुक झेरॉक्स, दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला. अर्ज कुठे करावा. नजिकच्या सीएससी केंद्रावर किंवा www.maandhan.in या संकेतस्थळावर.

17.कर्मविर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना :

योजनेचा लाभ या योजनेत जे भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांना लाभ मिळतो. व 50% अनुदान व 50% बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिला जातो. आवश्यक कागदपत्रे. फोटोसह विहीत नमुन्यातील अर्ज 2 , रहिवासी दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड. वार्षिक उत्पन्नाचा दाखला. 60 वर्षाखालील असल्याचा वयाचा दाखला. अर्ज कुठे करावा. जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय किंवा http:// sjsa. Maharashtra.gov. In या संकेतस्थळावर.

18. विमुक्त जाती व भटक्या जमाती च्या प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना :

योजनेचा लाभ. ग्रामीण भागातील निवड झालेल्या कुटुंबास प्रत्येकी 5 गुंठे जमीन देउन 269 चौ. फुट घर बांधून देणे. आवश्यक कागदपत्रे. सक्षम प्रधिकार्याने दिलेले जात प्रमाणपत्र. महाराष्ट्र राज्यातील वास्तव्या बाबतचे अधिवास प्रमाणपत्र. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असल्याचे सक्षम प्रधिकार्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र. अर्ज कुठे करावा. नजिकच्या सीएससी केंद्रावर. किंवा www.maandhan.in या संकेतस्थळावर.

19.गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टाईल देण्याची योजना :

या योजनेचा लाभ. 100% अनुदान तत्वावर लोखंडी पत्र्याचे स्टाॅल व 500 रुपये अनुदान. आवश्यक कागदपत्रे. अनुसूचित जातीचा दाखला, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागाकरिता 40,000 व शहरी भागाकरीता 50,000 पेक्षा जास्त नसल्याबाबतचा तहसीलदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. अर्ज कुठे करावा. जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय किंवा https://Sjsa. Maharashtra. gov. In.

20.इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना :

योजनेचा लाभ. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये निवृत्ती वेतन दिले जाते. आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड, रेशन कार्ड, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, पतीचे मृत्यू प्रमाणपत्र., रहिवासी प्रमाणपत्र. अर्ज कुठे करावा.जिल्ह्याधिकारी कार्यालयामध्ये , तहसील संजय गांधी योजनेत किंवा तलाठी कार्यालयात. Mahilasathi Yojana

21.श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना :

योजनेचा लाभ. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रतिमहा निवृत्ती वेतन देण्यात येते. . आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड , पासपोर्ट फोटो, रहिवासी प्रमाणपत्र, तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र. रेशनकार्ड. अर्ज कुठे करावा. जिल्ह्याधिकारी कार्यालय, तहसीलदार, तलाठी कार्यालय येथे कुठेही अर्ज करू शकता.

22.संजय गांधी निराधार योजना :

योजनेचा लाभ. 35 वर्षावरील अविवाहित महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येते. आवश्यक कागदपत्रे. वयाचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबाबत चा साक्षांकित उतारा. अर्ज कुठे करावा. अर्जदार राहत असलेल्या भागातील तलाठी किंवा तहसीलदार ऑफिस मध्ये.

23. शेळी गट किंवा दुधाळ जनावर वाटप योजना :

या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील विधवा किंवा एकल महिलांना शेळी, बोकड, किंवा दोन म्हशी, दोन गाय देऊन त्यांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी ही योजना राबवली जाते. आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, अपत्य प्रमाणपत्र, जागेचा 8 – अ अर्ज, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र. अर्ज कुठे करावा. पंचायत समिती, पशुसंवर्धन विभाग येथे अर्ज करू शकता.

24.राष्ट्रिय कुटुंब लाभ योजना :

योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला 20,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड, रहिवासी दाखला, मृत्यू दाखला, वारस दाखला. अर्ज कुठे करावा लागतो. तहसील कार्यालयात.

25. शबरी आवास योजना :

योजनेचा लाभ या योजनेमध्ये घरकुल भेटतो. आवश्यक कागदपत्रे. ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, स्वतः च्या मालकीची जागा असल्याचा पुरावा, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र. अर्ज कुठे करावा. जिल्ह्याधिकारी कार्यालयात किंवा तलाठी कार्यालयात.

26.कन्यादान योजना :

योजनेचा लाभ वर किंवा वधू यापैकी ए अनुसूचित जमातीचे असल्याने या योजनेअंतर्गत प्रति जोडप्यांना 10,000 रुपये आणि मेळावा आयोजित करणार्या सेवाभावी संस्थांना प्रत्येकी विवाह मेळाव्याला 10,000 रुपये एवढी रक्कम बॅंक खात्यात जमा करण्यात येते. आवश्यक कागदपत्रे वर व वधू चे जातीचे प्रमाणपत्र. वर व वधुचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र. वर व वधुचे रहिवासी दाखला. ग्रामसेवकाचा दाखला. अर्ज कुठे करावा. जिल्ह्याधिकारी कार्यालयात किंवा तलाठी कार्यालय येथे.

27. शासकीय महिला राज्य ग्रह :

योजनेचा लाभ. 16 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांना शासनामार्फत 16 जिल्ह्यात एकूण 20 महिला वसतिगृह कार्यरत आहेत. गरजु महिला वसतिगृहात लाभ घेऊन 2 ते 3 वर्ष राहु शकतात. आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड, रेशन कार्ड, पासबुक. अर्ज कुठे करावा. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी येथे.

28.सखी निवास योजना :

योजनेचा लाभ या योजनेअंतर्गत महिलांना समिती निवास येथे निवास, जेवन, त्याच्या मुलांसाठी पाळणाघराची सुविधा, वैद्यकीय मदत सुरक्षा ईत्यादी सुविधा पुरविल्या जातात. सखि निवास येथे 3 वर्षापर्यंत निवास करता येतो. आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बॅंक पासबुक, नोकरीचे नियुक्ती पत्र अर्ज कुठे करावा. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी येथे.

29.शुभमंगल सामुहिक विवाह योजना :

योजनेचा लाभ शेतमजुरांच्या मुलांच्या विवाहासाठी प्रति जोडप्यांना 10,000 रुपये अनुदान वधूच्या वडिलांच्या नावे शासनामार्फत देण्यात येते. आवश्यक कागदपत्रे. वर व वधुचे आधार कार्ड. वर व वधुचा रहिवासी दाखला, वर व वधुचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र. अर्ज कुठे करावा. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी येथे.

30.अनाथालये महिला स्विकार केंद्र व सुरक्षा गृहातील निराश्चीत मुलींच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य :

योजनेचा लाभ. अनाथ मुलीच्या विवाहासाठी 25,000 रुपये मुलींच्या नांवे बॅंकेत जमा केले जातात. आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड, रेशन कार्ड, बॅंक पासबुक. अर्ज कुठे करावा. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी येथे.

31.अंत्योदय अन्न योजना :

योजनेचा लाभ ही योजना विधवा, गर्भवती स्त्रीया यांच्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत यांना दोन व तिने रुपये किलो नी धान्य मिळते. आवश्यक कागदपत्रे. रहिवासी दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड. अर्ज कुठे करावा. रेशन दुकान, तहसील कार्यालय, जिल्हा पूरवठा अधिकारी येथे.

32.डाॅ.अब्दुल कलाम अमृत योजना :

योजनेचा लाभ. अनुसूचित जमातीचे क्षेत्र असलेल्या 16 जिल्ह्यातील गरोदर स्त्रियांसाठी या योजनेचा लाभ होतो. अनुसूचित जमाती क्षेत्रातील महिलांना अंगणवाडी मधुन एक वेळचे पोषण आहार दीले जाते. आवश्यक कागदपत्रे. रेशन कार्ड, आधार कार्ड, गरोदर किंवा स्तनदा महिलांना अंगणवाडी मध्ये नोंदणी करणे. अर्ज कुठे करावा. अंगणवाडी सेविकेकडे.

33.जननी सुरक्षा योजना :

योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक गर्भवती महिलेस सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आवश्यक कागदपत्रे. महिलेचे आधार कार्ड, बॅंक पासबुक, mcp कार्ड, बिपीएल कार्ड. अर्ज कुठे करावा. नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा आशा सेविका याच्याकडे.

34. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना :

योजनेचा लाभ या योजनेमध्ये महिलेला 11 हजार रुपये दिले जाते . गरोदर महिलेसाठी ही योजना आहे. आवश्यक कागदपत्रे. अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, बॅंक पासबुक झेरॉक्स, mcp कार्ड, मोबाईल क्रमांक. अर्ज कुठे करावा. महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर.

35.बेबी केअर किट योजना :

योजनेचा लाभ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहिल्या प्रसुतीवेळी जन्माला येणार्या बाळाला 2हजार रुपयाचे बाळाच्या उपयोगासाठी बेबी केअर किट दिले जाते. तसेच सर्व साहित्य ठेवण्यासाठी बॅग दिलि जाते. आवश्यक कागदपत्रे. रेशन कार्ड, आधार कार्ड, अर्ज कुठे करावा. अंगणवाडी सेविका किंवा नजिकच्या शासकीय रुग्णालयात. Mahilasathi Yojana

36.किशोरी सबला योजना :

योजनेचा लाभ या योजने अंतर्गत 11 ते 14 वर्षे वयोगटातील मुलीना मदत दिली जाते. वर्षातील 300 दिवस पोषण आहार मिळावा यासाठी शाळेतील किंवा शाळा सोडलेल्या मुलींना सुद्धा आर्थिक मदत दिली जाते. आवश्यक कागदपत्रे. अर्जदाराचा फोटो, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, बॅंक पासबुक झेरॉक्स. अर्ज कुठे करावा. अंगणवाडी सेविका याच्याकडे किंवा नजिकच्या शासकीय रुग्णालयात.महिला व मुलींसाठी काही विशेष योजना याबद्दल सविस्तर माहिती पहा

लवकरच वरील सर्व महिला व मुलींसाठी काही विशेष योजना योजनाची सविस्तर माहिती आपल्या वेबसाईटच्या तुमच्य पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करु. Mahilasathi Yojana Mahilasathi Yojana महिला व मुलींसाठी काही विशेष योजना याबद्दल आधिक माहितीसाठी शासनाच्या संकेतस्थळा भेट द्या.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!