Join WhatsApp group

श्री.ह.व्या.प्र मंडळाच्या कुस्तीगीरांचा आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत 10 सुवर्ण व 5 रौप्य

Photo of author

By Sarkarmzanews

Share

जितेंद्र भुयार अमरावती _दिनांक 16 ते 18 ऑक्टोबर 2024 या दरम्यान श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन मध्ये आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये अमरावती विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ येथील कॉलेजमधील जवळपास 150 ते 200 पुरुष व महिला कुस्तीगीरचा सहभाग होता त्यामध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कुस्तीगीरांनी सहभाग घेतला होता.

त्यामध्ये 55 किलो करण यादव सुवर्ण 60 किलो नामदेव बुरकुले सुवर्ण 63 किलो अनुज सारवान सुवर्ण 67 किलो प्रदीप यादव सुवर्ण 72 किलो अंकित यादव सुवर्ण 130किलो दानिश खान 50 किलो सोनाली गुप्ता सुवर्ण 53 किलो कोमल गवई सुवर्ण 57 किलो उर्जिता नेटके सुवर्ण 68 कीलो वैष्णवी सोनोणे सुवर्ण 72 किलो गौरी धोटे सुवर्ण 61 किलो तेजस ठाकूर रौप्य 67किलो पृथ्वीराज तिरथकर रौप्य 77किलो अभय चोपडेरौप्य 97किलो आयुष ठाकरे रौप्य 55 किलो बाली पवार रौप्य पदके मिळवली आहे.

पंजाब भटिंडा येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेकरिता यांची निवड झाली आहे हे सर्व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ कुस्ती विभागात डॉ संजय तिरथकर तुमच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर रावजी वैद्य सचिव डॉ माधुरीताई चेंडके उपाध्यक्ष डॉ श्रीकांत चेंडके डीसीपीई चे प्राचार्य श्रीनिवास देशपांडे डॉ लक्ष्मीकांत खंडागळे प्रा रवींद्र खांडेकर अँड प्रशांत देशपांडे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!