Join WhatsApp group

ऑपरेशन प्रहार अंतर्गत हिवरखेड पोलिसांची धारधार कारवाई — घातक शस्त्रसाठा जप्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : २९ /१०/२५ :

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई करत घातक अग्नीशस्त्र आणि धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹१६,३००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम “ऑपरेशन प्रहार” राबवली जात आहे.

या मोहिमेअंतर्गत दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी हिवरखेड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, लकी कॉलनी, हिवरखेड येथील आरोपी समीरोददीन शरीफोददीनशरीफोददीन इकामोददीन यांनी त्यांच्या घरात बेकायदेशीर शस्त्रे लपवून ठेवली आहेत.

पोलीस ठाणेदार गजानन राठोड यांच्या नेतृत्वाखाली पंचांच्या उपस्थितीत आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली असता एका खोलीत प्लास्टिकच्या टाकीत लपवून ठेवलेले पुढील शस्त्रसाठा आढळला:

  1. स्टील धातूची धारदार तलवार — किंमत ₹५००/-
  2. लोखंडी पट्ट्याची तलवार — किंमत ₹४००/-
  3. लोखंडी पात्याची तलवार — किंमत ₹४००/-
  4. पिस्तूल (मॅगझीनसह) — किंमत ₹१५,०००/-

एकूण मुद्देमाल किंमत ₹१६,३००/- इतका आहे. पोलिसांनी हा साठा जप्त करून आरोपींविरुद्ध गु.र.नं. २८३/२०२५, कलम ३, ४/२५ शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्री. रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट श्री. निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोहेकॉ. प्रमोद चव्हाण, पोहेकॉ. पंकज मडावी, पोको. अमोल बुंदे, पोको. आकाश गजभार, पोको. प्रमोद भोंगळ, मपोको. नेहा सोनोन यांनी सहभाग घेतला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!